India-China Violent Face-Off in Ladakh: लडाख येथील गलवान व्हॅलीत भारत-चीन सैन्यातील झटापटीत शहीद झालेल्या 20 जवानांची नावे
आज त्यांच्या पार्थिवास भारतीय सैन्याकडून पुष्पाहार अर्पण करण्यात आले. तसंच या 20 शहीद जवानांची नावे देखील समोर आली आहेत.
लडाखच्या (Ladakh) गलवान व्हॅलीत (Galwan Valley) काल (16 जून) झालेल्या भारत-चीनी सैनिकांमधील झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले. आज त्यांच्या पार्थिवास भारतीय सैन्याकडून पुष्पाहार अर्पण करण्यात आले. तसंच या 20 शहीद जवानांची नावे देखील समोर आली आहेत. भारतीय सैन्यातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि चीन यांच्यातील वाद मिटवण्यासाठी लष्कर प्रमुखांच्या चर्चा सुरु आहेत.
काल (16 जून) सकाळी 2 जवान आणि एक अधिकारी शहीद झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर संध्याकाळी आलेल्या अधिकृत माहितीनुसार, 20 सैनिक शहीद असून 17 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. (लडाख मधील भारत-चीन दरम्यान तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 19 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक)
ANI Tweet:
20 शहीद जवानांची नावे:
1. कर्नल बी संतोष बाबू
2. एनबी सब नुदुराम सोरेन
3. एसबी सब मंदीप सिंग
4. एनडी सब सतनाम सिंह
5. एचएव्ही के पलानी
6. एचएव्ही सुनील कुमा
7. एचएव्ही बिपुल रॉय
8. एनके दीपक कुमार
9. एसईपी राजेश ओरंग
10. एसईपी कुंदन कुमार ओझा
11. एसईपी गणेश राम
12. एसईपी चंद्रकांता प्रधान
13. एसईपी अंकुश
14. एसईपी गुरबिंदर
15. एसईपी गुरतेज सिंग
16. एसईपी चंदन कुमार
17. एसईपी कुंदन कुमार
18. एसईपी अमन कुमार
19. एसईपी जय किशोर सिंह
20. एसईपी गणेश हंसदा
शहीदांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करतानाचा व्हिडिओ:
भारत-चीन दरम्यान निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 जून रोजी सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे. संध्याकाळी 5 वाजता ही बैठक पार पडणार असून या बैठीकीला सर्व पक्षांचे अध्यक्ष उपस्थिती राहणार आहेत.