Mysuru Crime: म्हैसूर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळल्याने खळबळ; सामूहिक आत्महत्येचा संशय
म्हैसूरच्या बांदिपलयामध्ये एपीएमसीमध्ये भाजीपाल्याचे दुकान होते. गेल्या दोन दिवसांपासून घराचा दरवाजा न उघडल्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला ज्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलवले.
कर्नाटक शहराची राजधानी बंगळूरुहून जवळच असलेल्या म्हैसुर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. म्हैसूरमध्ये एका भाड्याच्या घरात एकाच कुटुंबातील 4 लोकांचे मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या सर्वांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी सध्या व्यक्त केला असून याबाबतचा अधिक तपास सध्या सुरू आहे. म्हैसूर (Mysore) शहरात महादेवस्वामी आणि अनिता दोघे दांपत्य राहतात. त्यांना दोन मुलीही आहेत. म्हैसूरच्या बांदिपलयामध्ये एपीएमसीमध्ये भाजीपाल्याचे दुकान होते. गेल्या दोन दिवसांपासून घराचा दरवाजा न उघडल्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला ज्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलवले.
पोलीस घरी आल्यावर त्यांना दरवाजा आतून बंद असल्याचे आढळून आले. मागील दार उघडले असता संपुर्ण कुटुंब मृतावस्थेत आढळले. या चौघांच्या मृत्यूला 48 तासांपेक्षा जास्त वेळ झाल्याची भीती देखील पोलिसांनी व्यक्त केली आहे. महादेव स्वामी यांच्या फोनवरुन शेवटचा कॉल हा गुरुवारी करण्यात आला होता. या ठिकाणी पोलीस घरात गेले असता त्यांना एका मुलीचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तर उर्वरित जमिनीवर मृतावस्थेत आढळले.
या कुटूंबाने सामूहिक आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. महादेवस्वामी (45), त्यांची पत्नी अनिता (38), मुलगी चंद्रकला (17) आणि धनलक्ष्मी (15) अशी या सर्वांची नावे आहेत. दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत
(The above story first appeared on LatestLY on Aug 28, 2023 03:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

