मुंबईतील 'के. रुस्तम आईस्क्रीम' वर मोठी कारवाई, कशासाठी प्रसिद्ध होते, हे तुम्हाला माहीत आहे का?

मुंबईतील चर्चगेट परिसरातील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक 'के. रुस्तम अँड कंपनी' आईस्क्रीम पार्लरचा परवाना अन्न व औषध प्रशासनाने (FDA) गंभीर अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तात्काळ निलंबित केला आहे.

मुंबईतील 'के. रुस्तम आईस्क्रीम' वर मोठी कारवाई, कशासाठी प्रसिद्ध होते, हे तुम्हाला माहीत आहे का?
तुकाराम मुंढे (Photo Credits-ANI)

मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळ असलेले अत्यंत प्रसिद्ध आणि ऐतिहासिक 'के. रुस्तम अँड कंपनी' (K Rustom & Co) हे आईस्क्रीम पार्लर सध्या मोठ्या वादात सापडले आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) या दुकानावर अचानक छापा टाकून गंभीर अस्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ प्रभावानं निलंबित केला आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या 'सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र' मोहिमेचा भाग म्हणून ही धдук कारवाई करण्यात आली असून प्रयोगशाळेचा अहवाल येईपर्यंत हे दुकान बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आईस्क्रीम सँडविच आणि ७० वर्षांचा वारसा

खोदाबक्ष रुस्तम इराणी यांनी १९५३ मध्ये सुरू केलेले 'के. रुस्तम' हे मुंबईतील सर्वात जुन्या आणि सर्वात ओळखल्या जाणाऱ्या आईस्क्रीम केंद्रांपैकी एक आहे. हे पार्लर त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण 'आईस्क्रीम सँडविच'साठी जगभरात प्रसिद्ध आहे. यामध्ये दोन कुरकुरीत वेफर्सच्या मध्ये आईस्क्रीमचा एक मोठा तुकडा (स्लॅब) ठेवून ग्राहकांना दिला जातो. दक्षिण मुंबईतील मरीन ड्राईव्हजवळ फेरफटका मारण्यासाठी येथे येणारे स्थानिक मुंबईकर, पर्यटक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी गेल्या सात दशकांपासून हे एक हक्काचे आणि लोकप्रिय ठिकाण राहिले आहे.

एफडीएच्या कारवाईचे मुख्य कारण

एफडीएच्या पथकाने केलेल्या अचानक तपासणीदरम्यान या ऐतिहासिक दुकानात ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. तपासणी अहवालानुसार, दुकानाच्या आवारात आणि साठवणुकीच्या जागेत जिवंत उंदीर आणि घरगुती माशांचा मोठ्या प्रमाणावर वावर असल्याचे आढळून आले. याशिवाय, आईस्क्रीम सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक असलेली 'कोल्ड चेन ऑपरेशन्स' योग्य पद्धतींने कार्य करत नव्हती. तसेच, व्यवसायासाठी आवश्यक असलेले अनिवार्य अन्न सुरक्षा रेकॉर्ड देखील दुकानात राखले गेले नव्हते.

(The above story first appeared on LatestLY on Jul 09, 2026 06:52 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).