Mukesh Ambani's Grandson Name: मुकेश अंबानी नातवाला 'या' नावाने हाक मारणार, श्लोका-आकाश यांच्या मुलाचा पार पडला नामकरण सोहळा

प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे आजोबा झाले आहेत. याच महिन्यात त्यांची सून श्लोका मेहता हिने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता.

Mukesh Ambani's Grandson Name: मुकेश अंबानी नातवाला 'या' नावाने हाक मारणार, श्लोका-आकाश यांच्या मुलाचा पार पडला नामकरण सोहळा
मुकेश अंबानी (Photo Credits: Instagram)

Mukesh Ambani's Grandson Name: प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे आजोबा झाले आहेत. याच महिन्यात त्यांची सून श्लोका मेहता हिने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. अंबानी परिवाराने या चिमुकल्याचे आगमन झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता मुकेश अंबानी यांच्या नातवाचा नामकरण सोहळा पार पडला आहे. एका विधानात अंबानी परिवाराने असे म्हटले की, आकाश आणि श्लोका यांनी आपल्या मुलाचे नाव पृथ्वी आकाश अंबानी (Prithvi Akash Ambani) असे ठेवण्यात आले आहे. यापूर्वी जेव्हा मुकेश अंबानी आजोबा झाले होते त्यावेळी त्यांचा चिमुकल्यासोबतचा फोटो तुफान सोशल मीडियात व्हायरल झाला होता.

नातवाचा सोबतचा मुकेश अंबानी यांचा फोटो परिमल नथवानी यांनी ट्विट करत शेअर केला होता. या फोटोला त्यांनी कॅप्शन देत असे म्हटले की, आकाश आणि श्लोका यांना मुलगा झाल्याने त्यांना शुभेच्छा, नव्या पाहुण्याच्या आगमनासाठी मुकेश भाई, नीता आणि संपूर्ण अंबानी परिवाराल सुद्धा शुभेच्छा.(Ambani कुटुंबामध्ये आला नवा चिमुकला; Akash Ambani-Shloka Mehta यांना पुत्रप्राप्ती)

दरम्यान, 10 डिसेंबरला मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि पत्नी श्लोका मेहता यांच्या घरी चिमुकल्याचा जन्म झाला. अंबानी परिवारात नव्या सदस्याच्या येण्याने आणि आजी-आजोबा झाल्याने नीता यांच्यासह मुकेश अंबानी खुपच खूश झाले आहेत. तर भगवान श्रीकृष्णची कृपा आणि आशीर्वाद श्लोका आणि आकाश यांच्यावर सैदव रहावी असे ही अंबानी परिवाराने म्हटले.(Akash Ambani Shloka Mehta Wedding: शाहरुख खान, प्रियंका चोप्रा, बच्चन कुटुंबीय अवघं बॉलिवूड पोहचलं आकाश-श्लोका यांच्या लग्नाला!)

आकाश आणि श्लोका यांचा विवाह गेल्या वर्षात म्हणजेच 2019 मध्ये मार्च महिन्यात झाला होता. या विवाह सोहळ्यासाठी देशातील आणि विदेशातील दिग्गज मंडळींची उपस्थिती दिसून आली होती. या भव्य अशा विवाह सोहळ्याला बॉलिवूड कलाकार ही हजर झाले होते.

(The above story first appeared on LatestLY on Dec 25, 2020 10:31 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).