भारतामध्ये mpox चा शिरकाव; हरियाणाचा 26 वर्षीय तरूण बाधित असल्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

monkeypox च्या रूग्णामध्ये गळ्याला सूज येणं, डोकेदुखी, अंगदुखी आणि अशक्तपणा ही लक्षणं दिसत आहे.

Hospital Death | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

भारतामध्येही mpox चा शिरकाव झाला आहे. The Ministry of Health ने दिलेल्या माहितीनुसार भारतामधील mpox चा पहिला संशयित रूग्ण हा चाचणी नंतर बाधित असल्याचं स्पष्ट झालं आहे. 26 वर्षीय तरूण हरियाणाच्या हिसार मधील आहे. काही दिवसांपूर्वी तो परदेशातून भारतात आला आहे. शनिवारी या रूग्णाला दिल्लीच्या रूग्णात दाखल करण्यात आले. सध्या तो आयसोलेशन मध्ये आहे.

mpox ची लक्षणं दिसल्यानंतर त्याला आयसोलेट करण्यात आले होते. भारतामध्ये दिल्लीत सध्या Lok Nayak Jai Prakash (LNJP) Hospital, GTB आणि Baba Saheb Ambedkar ही तीन हॉस्पिटल्स mpox च्या रूग्णांसाठी सज्ज ठेवण्यात आली आहे. या हॉस्पिटल मध्ये आयसोलेशन रूम बनवण्यात आल्या आहेत.

भारतीयांना चिंतेचं कारण?

World Health Organisation कडून जगभरात वाढणारे mpox चे रूग्ण पाहता health emergency जाहीर करण्यात आली आहे. सध्या भारतामध्ये आढळलेला पहिला रूग्ण हा Clade 2 व्हेरिएंटने बाधित आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार Clade 2 हा सध्या जारी हेल्थ इमरजंसी मध्ये नाही. Democratic Republic of Congo मध्ये dubbed Clade 1b च्या व्हेरिएंट्सचे रूग्ण समोर आल्यानंतर हेल्थ इमरजंसी जाहीर झाली होती. dubbed Clade 1b स्ट्रेन सप्टेंबर 2023 मध्ये Democratic Republic of Congo मधील सेक्स वर्कर्समध्ये पहिल्यांदा आढळला होता. बुरुंडी, केनिया, रवांडा आणि युगांडा येथे देखील रूग्ण सापडले होते.

भारतामध्ये पहिल्या mpox बाधित रूग्णची स्थिती कशी?

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, रूग्णाची माहिती क्लिनिकली स्टेबल आहे. त्याला comorbidities नाहीत. त्यामुळे सध्या रूग्णाची स्थिती चिंताजनक नाही. तसेच भारतामध्ये अजूनही स्थिती चिंताजनक बनलेली नाही. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान सध्या उपचार घेत असलेल्या रूग्णाच्या जवळच्या व्यक्तींचे देखील कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जात आहे.

 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif