चेन्नई: आंतरजातीय प्रेमप्रकरणाला विरोध करत रागाच्या भरात जन्मदात्या आईने मुलीला जिवंत जाळून स्वत: लाही दिले पेटवून, तरुणीचा मृत्यू तर आरोपी महिलेची प्रकृती चिंताजनक

इतकच नव्हे तर मुलीला या माऊलीने स्वत:लाही पेटवून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

हृद्य पिळवटून टाकणारी घटना चेन्नई येथे घडली आहे. मुलीच्या आंतरजातीय प्रेमप्रकरणाला विरोध करत रागाच्या भरात जन्मदात्या आईनेच आपल्या 17 वर्षांच्या मुलीला जिवंत जाळले. इतकच नव्हे तर मुलीला या माऊलीने स्वत:लाही पेटवून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. न्यूज 18 लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, मुलीच्या प्रेमप्रकणावरून या दोघींमध्ये घरात वाद झाला. त्यावेळी मुलीच्या हट्टवादीपणामुळे आणि आपल्याला जुमानत नसल्याचे पाहून संतप्त झालेल्या आईने मुलीच्या अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला ही पेटवून दिले. या घटनेनंतर मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र यात तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हेदेखील वाचा- नालासोपारा: शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्या कारणाने 14 वर्षीय मुलीला आरोपीने केली बेदम मारहाण; पीडित मुलगी गंभीर जखमी

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलीचे एका तरुणावर प्रेम होते. तरुण आंतरजातीय असल्यामुळे आईचा त्यांच्या लग्नाला विरोध होता आणि याच्यामुळे या दोघींमध्ये प्रचंड वाद झाला. या वादाचे रुपांतर या क्रूर कृत्यात झाले.

यात मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असन तिची आई नागपट्टिनम रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाने अद्याप आईविरोधात कोणतीही तक्रार दाखल केली नसून पोलीस आता मृत तरुणीच्या शेजाऱ्यांची चौकशी करणार आहेत. या घटनेमुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या कलयुगात काय घडेल याचा काही नेम नाही. काही महिन्यांपूर्वी सहाव्या इयत्तेत शिकणा-या मुलीने आपल्या पित्याकडून शाळेसंबंधी वस्तू विकत घेण्यासाठी पैशांची मागणी केली म्हणून दारुच्या नशेत असलेल्या बापाने आपल्या मुलीलाच कीटकनाशक पाजल्याचा धक्कादायक प्रकार नाशकात घडला.

ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी आपले वडिल खूप दारू प्यायले होते आणि दारूच्या नशेतच त्यांनी हा गुन्हा केला असे त्याने पोलिसांना सांगितले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif