Most Helpful MPs During COVID-19 Lockdown: हेमंत गोडसे, राहुल गांधी, तेजस्वी सूर्या यांच्यासह या खासदारांनी कोरोना व्हायरस संकटात केली मोठी मदत; पहा टॉप 10 MP's यादी

त्यात शिवसेनेचे हेमंत गोडसे, वायनाड चे खासदार राहुल गांधी, उज्जेनचे खासदार अनिल फिरोजिया, YSRCP Nellore चे खासदार प्रभाकर रेड्डी यांच्या नावाचा समावेश आहे.

Most Helpful MPs during lockdown (Photo Credits: Twitter/PTI)

कोरोना व्हायरस संकटकाळात (Coronavirus Pandemic) आपल्या मतदारसंघात सर्वाधिक मदत करणाऱ्या खासदारांची (MP's) नावे समोर आली आहेत. त्यात शिवसेनेचे हेमंत गोडसे (Hemant Godse), वायनाड चे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi), उज्जेनचे खासदार अनिल फिरोजिया (Anil Firojiya), YSRCP Nellore चे खासदार प्रभाकर रेड्डी (Prabhakara Reddy), तेजस्वी सूर्या (Tejasvi Surya) यांच्या नावाचा समावेश आहे. GovernEye Systems नावाच्या दिल्लीमधील एका कंपनीने सर्वे करुन ही माहिती सादर केली आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, 1 ऑक्टोबर पासून एक सर्वे लॉन्च करण्यात आला होता. लोकांनी दिलेल्या प्रतिसादानुसार लोकसभेचे 25 खासदारांची नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली होती. मतदारसंघातील लोकांकडून घेतलेल्या मुलाखतींनुसार या यादीतील टॉप 10 खासदारांची नावे समोर आली आहेत.

Top 10 MP's List:

# हेमंत तुकाराम गोडसे (शिवसेना)

# अनिल फिरोजिया (भाजप)

# अडाला प्रभाकर रेड्डी (YSRCP)

# राहुल गांधी (INC)

# महुआ मोइत्रा (टीएमसी)

# एल.एस. तेजस्वी सूर्या (भाजप)

# सुखबीरसिंग बादल (एसएडी)

# शंकर लालवाणी (भाजप)

# डॉ. टी. सुमाती (अ) थमीझाची थांगापंडियन (DMK)

# नितीन जयराम गडकरी (भाजप)

लोकसभेतील 512 खासदारांसाठी 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2020 दरम्यान 33,82,560 नामांकन आली होती.

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, राहुल गांधींनी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी खूप कष्ट घेतले, असे त्यांच्या मतदारसंघातील लोकांचे म्हणणे आहे. लोकांना मास्क, सॅनिटायझर्स, थर्मामिटर्स आणि हॉस्पिटल्संना व्हेंटिलेटर्स पुरवण्याचे काम देखील राहुल गांधी यांनी केले. फक्त आपल्या मतदारसंघातच नाही तर देशातील विविध राज्यांमध्ये अडकलेल्या लोकांची आणि परदेशी अडकलेल्या भारतीय नागरिकांची देखील त्यांनी मदत केली.

या सर्वे टीमचे सिनियर प्रोजेक्ट लीड मंजूनाथ केरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या निकालातून केवळ नावे समोर येत आहेत, परंतु, कोविड-19 काळात या खासदारांनी आरोग्यासंबंधित केलेलं शौर्याचं काम आम्हाला त्यांच्या मतदारासंघातील लोकांकडून कळाले आहे. या काळात स्वत:ची सुरक्षा धोक्यात घालून लोकांना सेवा करण्याची मौल्यवान काम या खासदारांनी केले आहे.