Monkeypox in India: देशात 'मंकिपॉक्स'चा पहिला रूग्ण केरळ मध्ये; प्रकृती स्थिर असल्याची माहिती
केरळ मधील या रुग्णाचे नातेवाईक देखील निरीक्षणाखाली आहेत आणि त्याचप्रमाणे इतर 11 प्रवासी देखील त्या रुग्णाच्या जवळच्या संपर्कात आल्याने त्यांच्यावरही लक्ष देण्यात आले आहे.
भारतामध्येही आता 'मंकिपॉक्स'(Monkeypox) चा शिरकाव झाला आहे. केरळ मधील एक 35 वर्षीय व्यक्ती देशात 'मंकिपॉक्स'चा पहिला रूग्ण असल्याची बाब समोर आली आहे. हा रूग्ण यूएई (UAE) मधून परतला होता. केरळच्या आरोग्यमंत्री Veena George यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'तो Thiruvananthapuram Airport वर मंगळवार (12 जुलै) दिवशी उतरला होता. त्याची तब्येत स्थिर असून सारे वायटल्स सामान्य आहेत.' केंद्र सरकार कडून सध्या NCDC ची टीम केरळला रवाना करण्यात आली आहे.
केरळ मधील या रुग्णाचे नातेवाईक देखील निरीक्षणाखाली आहेत आणि त्याचप्रमाणे इतर 11 प्रवासी देखील त्या रुग्णाच्या जवळच्या संपर्कात आल्याने त्यांच्यावरही लक्ष देण्यात आले आहे. दरम्यान, या रुग्णाला त्यांच्या वाहनात बसवणाऱ्या ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांचीही अधिकाऱ्यांनी ओळख पटवली आहे. हे देखील नक्की वाचा: Monkeypox: 'मंकीपॉक्स'च्या मुद्द्यावर केंद्राचे राज्यांना निर्देश - चाचणी पाळत वाढवावी, जगभरात आढळले 3413 प्रकरणे .
नवी दिल्लीतील एक डॉक्टर आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी तसेच त्याच्या प्रादेशिक कार्यालयातील तज्ञ अशी टीम ग्राउंड परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केरळ मध्ये दाखल आहे. ही टीम आवश्यक सार्वजनिक आरोग्य हस्तक्षेपांची शिफारस करेल, राज्याचे आरोग्य विभाग केंद्रीय टीमसोबत एकत्र काम करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
1958 मध्ये संशोधनासाठी वापरण्यात येणाऱ्या माकडांमध्ये हा आजार आढळला होता. त्यामुळे त्याला 'मंकीपॉक्स' असं नाव देण्यात आलं आहे. या आजारामध्ये ताप, अंगावर पुरळ अशी लक्षणं दिसतात. या आजारात मृत्यूदर 1 ते 10% आहे.