Government Banned On Tehreek E Hurriyat: जम्मू-काश्मीरमधील तेहरीक-ए-हुर्रियत या संघटनेवर बंदी, देशविरोधी कारवायांचा आरोप

जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावादाचा प्रसार करण्यासाठी दहशतवादी कारवाया घडवून आणण्यामध्ये आणि देशविरोधी कृत्यांमध्ये या संघटनेचा सहभाग आहे, असं अमित शाह यांनी म्हटले आहे.

Syed Ali Shah Geelani (Photo Credits: ANI)

केंद्र सरकारने (Central Government) मोठा निर्णय घेतला असून जम्मू-काश्मीरमधील (Jammu And Kashmir) तेहरीक-ए-हुर्रियत (Tehreek-e-Hurriyat) या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर यासंदर्भातली माहिती दिली आहे. “तेहरीक-ए-हुर्रियत या संघटनेला यूएपीए कायद्यांतर्गत बेकायदा म्हणून घोषित करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरला भारतापासून वेगळं करून तिथे इस्लामिक कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या कारवायांमध्ये या संघटनेचा सहभाग आहे. जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावादाचा प्रसार करण्यासाठी दहशतवादी कारवाया घडवून आणण्यामध्ये आणि देशविरोधी कृत्यांमध्ये या संघटनेचा सहभाग आहे”, असं अमित शाह यांनी म्हटले आहे.

पाहा पोस्ट -

काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने मुस्लीम लीग जम्मू-काश्मीर मसरत आलम गट (एमएलजेके-एमए) या संघटनेवरही अशाच प्रकारे देशविरोधी व फुटीरतावादी कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप करत बंदी घातली होती. या संघटनेचा म्होरक्या मसरत आलम भट याच्यावर पाकिस्तानधार्जिण्या कृत्यांना समर्थन दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे