Mizoram Elections 2023: मिझोराम मध्ये Zoram People's Movement सरकार करणार स्थापन; मुख्यमंत्रीपदाचे दावेदार Lalduhoma उद्या घेणार राज्यपालांची भेट
MNF, ZPM आणि काँग्रेसने प्रत्येकी 40 जागा लढवल्या, तर भाजपने 23 जागांवर उमेदवार उभे केले होते.
मिझोराम मध्ये आज विधानसभा निवडणूकीचे निकाल लागले आहेत. राज्यात 40 विधानसभेच्या जागेवर झालेल्या मतदानानंतर Zoram People's Movement या 6 पक्षांच्या आघाडीने राज्यात वर्चस्व मिळवलं आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडून सरकार बनवण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. 40 पैकी 26 जागांवर ZPM आघाडीवर असल्याचं चित्र आहे. मिझोराम मध्ये Mizo National Front च्या सरकार वर मात करून आता Zoram People's Movement चं नवं सरकार अस्तित्त्वामध्ये येत आहे.
Lalduhoma हे मिझोरामचे भावी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी Serchhip विधानसभेमधून MNF च्या J Malsawmzuala Vanchhawng यांचा 2982 मतांनी पराभव केला आहे. ते उद्या (5 डिसेंबर) मिझोरामच्या राज्यपालांची भेट घेतील. यानंतर पुढील सरकार स्थापनेची पावलं उचलली जातील. दरम्यान या निवडणूकीमध्ये काही मंत्र्यांचा देखील पराभव झाला आहे. त्यामध्ये Health minister R Lalthangliana, Rural development minister Lalruatkima यांचा समावेश आहे. . Assembly Elections 2023 Results: मणिपूरमध्ये 3 राज्यांमध्ये भाजपच्या विजयानंतर पक्षाच्या नेत्यांनी केला जल्लोष, पाहा व्हिडिओ.
पहा प्रतिक्रिया
पहा सेलिब्रेशन
7 नोव्हेंबर रोजी मिझोराम मध्ये मतदान झाले आणि राज्यातील 8.57 लाख मतदारांपैकी 80 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 18 महिलांसह एकूण 174 उमेदवार रिंगणात होते.
MNF, ZPM आणि काँग्रेसने प्रत्येकी 40 जागा लढवल्या, तर भाजपने 23 जागांवर उमेदवार उभे केले होते. येथे पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या आम आदमी पक्षाने (आप) चार जागांवर निवडणूक लढवली. तसेच 17 अपक्ष उमेदवार होते.