Ministry of Home Affairs Recruitment 2022: केंद्रीय गृह मंत्रालयात विविध पदांसाठी भरती, प्रति महिना तब्बल 1,12,400 रुपये पगार; घ्या जाणून
सहाय्यक संपर्क अधिकारी (Assistant Communication Officer), सहाय्यक लेखापाल (Assistant Accountant) आणि कनिष्ठ हिंदी अनुवादक (Hindi Translator) अशा विविध पदांसाठी ही भरती आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने विविध विभागांसाठी भरती (Ministry of Home Affairs Recruitment 2022) जाहीर केली आहे. सहाय्यक संपर्क अधिकारी (Assistant Communication Officer), सहाय्यक लेखापाल (Assistant Accountant) आणि कनिष्ठ हिंदी अनुवादक (Hindi Translator) अशा विविध पदांसाठी ही भरती आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी जाहीरत पाहून विहित नमुन्यांमध्ये आणि निश्चित वेळेत आपले अर्ज मागवले आहेत. गृहमंत्रालयाने नव्या भरती संदर्भात काढलेल्या अधिसूचनेनुसार, उमेदवार परिपत्रक जारी झाल्यापासून 60 दिवसांच्या आत विहित नमुन्यानुसार रिक्त पदांसाठी अर्ज करु शकतात.
गृह मंत्रालय भर्ती 2022 साठी तपशील
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता
उपसंचालक (प्रशासन), DCPW (MHA), ब्लॉक क्रमांक 9, CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली-110003 (हेही वाचा, SBI Recruitment 2022: एसबीआय मध्ये Specialist Cadre Officer साठी होणार नोकरभरती; sbi.co.in वर करा 4 मे पूर्वी अर्ज)
गृह मंत्रालय भर्ती 2022- पदे आणि पदसंख्या
सहाय्यक संपर्क अधिकारी: 4 जागा
सहाय्यक: 5 जागा
लेखापाल: 1 जागा
कनिष्ठ हिंदी अनुवादक: 1 जागा
गृह मंत्रालय भर्ती 2022- अटी व मर्यादा
गृह मंत्रालय भर्ती 2022- वयोमर्यादा, वेतन
उमेदवाराचे वय हे 56 वर्षांपेक्षा अधिक नसावे. उमेदवारांनी ध्यानात घ्यावे की त्यांचे वेतन हे मासिक वेतनश्रेणीच्या रुपये 35,400 ते 1,12,400 रुपयांच्या आसपास असेल. या नियुक्त्या या प्रतिनियुक्तीच्या तत्वावर असतील. ज्याचा कार्यकाळ तीन वर्षांपेक्षा अधिक असणार नाही. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटला नियमितपणे भेट देण्याचा सल्ला आम्ही देतो आहेत.