Ministry of Defense contract with BAPL: ब्रह्मोस या क्षेपणास्त्रासाठी संरक्षण मंत्रालयाचा बीएपीएलशी महत्वपूर्ण करार
संरक्षण मंत्रालयाने बीएपीएल बरोबर केलेल्या करारातून जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी ब्रह्मोस क्षेपणास्त्रे खरेदी करता येणार आहेत.
संरक्षण मंत्रालयाने (Ministry of Defense) बीएपीएल (BPL) म्हणजेच ब्रह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड (BrahMos Aerospace Private Limited) बरोबर एक महत्वपूर्ण करार केला. या करारातून जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी ब्रह्मोस (BrahMos) क्षेपणास्त्रे खरेदी करता येणार आहेत. तरी 1700 कोटी रूपयांची क्षेपणास्त्रे खरेदी केल्याची माहिती मिळत आहे. हे क्षेपणास्त्रे भारतीय नौदलाच्या (Indian Navy) ताफ्यात दाखल झाल्यानंतर नौदलाची कार्यक्षमता वाढणार आहे. संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भरतेला आणखी चालना देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने (Ministry of Defense) करार केला असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच नौदलात (Indian Navy) दाखल होणार हे ‘बाय इंडियन’ (By Indian) श्रेणीतील या क्षेपणास्त्रे आहेत. करारामुळे देशी उद्योगांचा सक्रिय सहभागही वाढेल.
भारतीय नौदलाच्या (Indian Navy) दृष्टीने जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ब्रह्मोस (BrahMos) या क्षेपणास्त्रासाठी संरक्षण मंत्रालयाने (Ministry Of Defence) केलेला ब्रह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड (BrahMos Aerospace Private Limited) बरोबर केलेला करार अत्यंत महत्वपूर्व ठरणार आहे. भारतीय नौदलाची शक्ती हा आणखीचं बलाढ्य करणार आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत आवश्यक असल्यासचं सांगितल्या जात आहे. तसेच शस्त्रास्त्र प्रणाली आणि दारूगोळा यांच्या देशांतर्गत उत्पादनाला या करारामुळे चालना मिळणार आहे. (हे ही वाचा:- जागतिक स्तरावरील 'ही' सॉफ्टवेअर फर्म FY23 साठी भारतात देणार 9000 जणांना Work From Anywhere सह नोकरीची संधी)
क्षेपणास्त्रासाठी संरक्षण मंत्रालयाने (Indian Navy) ब्रह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड (BrahMos Aerospace Private Limited) या कंपनीशी करार केला असुन ब्रह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड ही भारत आणि रशिया (Russia) यांच्यातील संयुक्त कंपनी असून नव्या आवृत्तीतील जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रांची क्षमता वाढविण्यात या कंपनीचे महत्त्वाचे योगदान आहे. तसेच जहाजांवरचे हल्ले परतवून लावण्यासाठी या क्षेपणास्त्रांचा पल्ला वाढविल्यामुळे ही क्षेपणास्त्रे दुहेरी भूमिका बजावण्यात मदत करणार आहे.