COVID 19 च्या रूग्णसंख्येमध्ये पुन्हा वाढ, Mutated Coronavirus ला रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नव्या गाईडलाईन्स जारी

केंद्रीय हवाई उड्डाण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आता 2 ऑगस्ट 2020 पासून लागू असलेली नियमावली रद्द करून आता 22 फेब्रुवारी 2021 पासून नवी नियमावली अंमलात आणली जाणार आहे.

Passengers at Chhatrapati Shivaji Maharaj International Airport in Mumbai (Photo Credit: PTI)

मुंबई, महाराष्ट्र सह देशात पुन्हा कोरोना रूग्णांची वाढ ही आता चिंतेची बाब होत चालली आहे. दरम्यान जगात काही ठिकाणी कोरोना वायरसमध्ये बदल होत आहे. आता हा नवा व्हेरिएंट अधिक वेगाने पसरू शकतो त्यामुळे सरकार देखील पुन्हा कडक पावलं उचलण्याच्या तयारीमध्ये आहे. काल (18 फेब्रुवारी) केंद्रीय हवाई उड्डाण मंत्रालयाकडून भारतामध्ये येणार्‍या नागरिकांसाठी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. भारतामध्ये mutated coronavirus ला रोखण्यासाठी ही नियमावली अंमलात आणली जाणार आहे.

केंद्रीय हवाई उड्डाण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आता 2 ऑगस्ट 2020 पासून लागू असलेली नियमावली रद्द करून आता 22 फेब्रुवारी 2021 पासून नवी नियमावली अंमलात आणली जाणार आहे. आता परदेशातून येणार्‍या नागरिकांना नव्या नियमावलीनुसार आपला प्रवास प्लॅन करावा लागणार आहे. युके, मिडल इस्ट मधून येणार्‍या विमानांना विशेष खबरदारीचे आदेश आहेत.

काय आहेत नव्या नियमावलीतील तरतूदी

दरम्यान मागील वर्षी मार्च महिन्यापासून आंतरराष्ट्रीय विमान प्रवास सर्वसामान्यांसाठी बंद आहे. हवाई मंत्रालयाने सध्या 28 फेब्रुवारी पर्यंत त्यावर बंदी कायम ठेवली आहे. मात्र वंदे भारत आणि एअर बबलच्या माध्यमातून मात्र काही देशातून भारतीयांना मायदेशी परतण्याची मुभा देण्यात आली आहे. परंतू सध्या दक्षिण आफ्रिका आणि युके मधील कोरोना वायरसच्या नव्या वायरसमुळे जगभर दहशत वाढली आहे. काही ठिकाणी रूग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे.