IPL Auction 2025 Live

Militant Attack in Manipur: मणिपूर मधील अतिरेकी हल्ल्याची MNPF ने घेतली जबाबदारी, ताफ्यात कर्नलसह पत्नी-मुलगा असल्याची नव्हती माहिती

एका कर्नलसह चार जवान शहीद झाले आहेत. तर कर्नल याच्या परिवारातील पत्नी-मुलगा यांचा सुद्धा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

फोटो सौजन्य- ANI

Militant Attack in Manipur: मणिपूर मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात सात जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. एका कर्नलसह चार जवान शहीद झाले आहेत. तर कर्नल याच्या परिवारातील पत्नी-मुलगा यांचा सुद्धा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळत आहे. अतिरेक्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. याच दरम्यान आता Manipur Naga People's Front (MNPF) यांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

हल्ल्याची जबाबदारी घेण्यासह एक नोट सुद्धा त्यांनी जाहीर केली आहे. त्या नोटमध्ये शनिवारी घडलेल्या घटनेबद्दल विस्तृतपणे सांगण्यात आले आहे. असे ही म्हटले की. हल्ला करणाऱ्यांना माहिती नव्हते त्या ताफ्यात कर्नल याची पत्नी आणि मुलगा सुद्धा आहे. अशातच एक नोटमध्ये जवानांना इशारा सुद्धा दिला होता की, त्यांनी संवेदनशील परिसरात परिवारासोबत येऊ नये. ज्या परिसरांना सरकारने सुद्धा सुरक्षिततेच्या दृष्टीने संवेदनशील मानले आहे तेथे परिवारासोबत राहणे ठिक नाही.(Militant Attack in Manipur: मणिपूरमध्ये अतिरेक्यांकडून मोठा हल्ला, असम राइफलचे कमांडिग अधिकारी, पत्नी-मुलासह 7 जणांचा मृत्यू)

हल्ल्यासंदर्भात संयुक्त विधान उप-प्रचार सचिव रोबेन खुमान आणि थॉमस नुमाई द्वारे दिली गेली आहे. त्यांच्याकडून हल्ल्याची पूर्ण जबाबदारी घेतली आहे. आता सरकार कधी आणि कोणत्या प्रकारे या संघटनेच्या विरोधात कारवाई करणार हे येत्या दिवसात स्पष्ट होणार आहे.

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या विप्लव आणि त्यांची पत्नी, मुलाचे शव आज संध्याकाळ पर्यंत रायगढ येथे पोहचवले जाणार आहे. शव रायपुर येथून सेनेच्या हेलिकॉप्टरमधून जिन्दल हवाई पट्टीवर उतरणार आहे. त्यानंतर शव हे रामलीला मैदानात अंतिम दर्शनासाठी ठेवले जाणार आहे.

दरम्यान, मणिपुरच्या चुराचांदपुर जिल्ह्यातील सिंघाट मध्ये अतिरेक्यांनी हल्ला केला. त्यांच्याकडून 46 असम राइफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विप्लव त्रिपाठी यांना निशाणा बनवले आणि त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला. हल्ला झाला तेव्हा त्यामध्ये कर्नल यांचा परिवार सुद्धा होता.