कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी मानसिक आरोग्याची काळजी घेण्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केल्या 'या' महत्त्वाच्या Guidelines

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात मानसिक आरोग्याची काळजी घेण्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

Coronavirus | (Photo Credits: Pixabay)

भारतात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रार्दुभाव रोखण्यासाठी आणि कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणासोबत सामान्य नागरिकही प्रयत्न करत आहे. कोविड योद्धा आपला जीव धोक्यात घालून लोकांचा जीव वाचवित आहे. अशा बिकट परिस्थिती अनेकदा आपले मनोबल खचते. त्यामुळे अशा काळात आपल्या मानसिक आरोग्याची (Mental Care) काळजी घेणे जरूरीचे असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून (Health Ministry of India) सांगण्यात आले आहे. म्हणूनच कोरोना प्रादुर्भावाच्या काळात मानसिक आरोग्याची काळजी घेण्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

याच्या आधारावर लोकांनी असा परिस्थिती नेमके काय करावे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहेत. यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना बाधितांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांना हात स्वच्छ धुणे, सोशल डिस्ंटसिंग प्रस्थापित करणे याबाबत माहिती देणे गरजेचे आहे. तसेच रुग्णालयात येणा-ाय व्हिजिटर्सची संख्या कमी करणे, तसेच सर्वांचे तापमान तपासणे या गोष्टी मानसिक आरोग्याची काळजी घेण्यास महत्त्वाच्या ठरतील. केंद्र सरकारने दिलेल्या या मार्गदर्शक सूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा. Coronavirus Update In India: एका दिवसात 24,248 नवे कोरोना रुग्ण; देशातील COVID-19 रुग्णांची संख्या 6,97,413 वर, 19,693 जणांचा मृत्यु

तर दुसरीकडे देशात 24 तासात कोरोनाचे 24,248 रुग्ण आढळले आहेत, तसेच 425 मृत्यूंची नोंद झाली आहे. यानुसार भारतातील कोरोना बाधितांची संख्या 6,97,413 वर पोहचली आहे. यात 2,53,287 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, 4,24,433 रुग्ण हे डिस्चार्ज मिळवलेले आहेत तर आतापर्यंत 19,693 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. या संदर्भात आरोग्य मंत्रालयातर्फे माहिती देण्यात आली आहे. देशात सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या यादीत अजूनही महाराष्ट्र(Maharashtra) पहिल्या स्थानी आहे