Manohari Gold Tea: आसामच्या दुर्मिळ चहाला यंदा लिलावात प्रतिकिलो 75,000 रूपयांचा विक्रमी दर

गुवाहटी टी ऑक्शन सेंटर (Guwahati Tea Auction Centre) मध्ये काल स्पेशॅलिटी चहा Manohari Gold Tea यंदा विक्रमी किंमतीला विकण्यात आली आहे. आसाम मध्ये झालेल्या चहा लिलावात याला विक्रमी म्हणजे प्रतिकिलो 75 हजार रूपयांचा भाव मिळाला आहे.

Tea| Image Used For Representational Purpose| Photo Credits: Pixabay.com

गुवाहटी टी ऑक्शन सेंटर (Guwahati Tea Auction Centre) मध्ये काल स्पेशॅलिटी चहा Manohari Gold Tea यंदा विक्रमी किंमतीला विकण्यात आली आहे. आसाम मध्ये झालेल्या चहा लिलावात याला विक्रमी म्हणजे प्रतिकिलो 75 हजार रूपयांचा भाव मिळाला आहे. आसाम मध्ये यापूर्वी मागील वर्षीच 13 ऑगस्टला झालेल्या लिलावात Upper Assam’s Dikom Tea Estate ने Golden Butterfly Tea ही 75 हजार प्रतिकिलोने विकली होती. तर Donyi Polo Tea Estate ही अरूणाचल प्रदेश मधील चहा निर्मिती कंपनीने देखील स्पेशॅलिटी चहा याच विक्रमी दराला विकला होता.

मनोहरी गोल्ड टी चं वैशिष्ट्य काय? 

Manohari Gold Tea चं वैशिष्ट्य म्हणजे ही चहा केवळ पहाटेच्या वेळेस हाताने खुरडली जाते. त्याला सूर्यप्रकाशापासून लांब ठेवलं जातं. पिवळया रंगाच्या या चहामध्ये yellowish malty liquor असते तर चहाला खास सुगंध देखील असतो. यंदा 2.5 kgs चहा बनवण्यात आला आहे, तर त्यापैकी 1.2 किलोग्राम चहाची काल लिलावात विक्री झाली आहे. उरलेला चहा गुवाहटी टी ऑक्शन सेंटर मध्ये उपलब्ध केला जाणार आहे. दरम्यान लिलावामध्ये गुवाहटीच्या Vishnu Tea Company ने चहा विकत घेतला असून त्याची निर्मिती Contemporary Brokers Private Limited

कडून करण्यात आली होती. आता हा चहा ई कॉमर्स साईट 9amtea.com वर विक्रीसाठी खुला केला जाईल. नक्की वाचा:  कशी झाली चहाची निर्मिती? जाणून घ्या उत्तम चहा बनवण्याची पद्धत.

यंदा आसामच्या चहा व्यावसायाला वर्षाच्या सुरूवातीला anti-CAA आंदोलनाचा फटका, त्यानंतर कोविड 19 लॉकडाऊन आणि काही दिवसांपूर्वी मान्सूनच्या धुव्वाधार पावसामुळे आलेल्या पुराचा फटका बसला आहे. आसाममध्ये चहा व्यवसायाच्या बॉडीजला सुमारे 1 हजार कोटींचं नुकसान सहन करावं लागत आहे. मात्र यंदा मनोहरी गोल्ड टी ला मिळालेली विक्रम किंमत दिलासादायक बाब  आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now