Mann Ki Baat, May 31, 2020 Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे लाईव्ह स्ट्रीमिंग इथे पहा
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (31 मे) सकाळी 11 वाजता 'मन की बात' (Maan Ki Baat) या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (31 मे) सकाळी 11 वाजता 'मन की बात' (Maan Ki Baat) या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉक डाउनच्या पाचव्या (Lockdown 5.0) टप्प्याबाबत आज मोदी जनतेला सविस्तर माहिती देतील अशी अपेक्षा आहे. सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम आकाशवाने आणि दूरदर्शनच्या माध्यमातून प्रसारित केला जाईल. याशिवाय पीएमओ च्या ट्विटर हॅण्डल वरून सुद्धा तुम्ही हा कार्यक्रम ऐकू शकणार आहात. याशिवाय खाली दिलेल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला मन की बात कार्यक्रम ऐकता येणार आहे. आजच्या मन की बात कार्यक्रमाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
प्राप्त माहितीनुसार, देशभरातील कंटेन्मेंट झोनमध्ये लॉक डाऊन 5.0 चे काटेकोरपणे पालन करताना कोणत्या बाबतीत सूट मिळेल यासंदर्भात नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. कंटेन्मेंट झोनमध्ये 30 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असून केवळ अत्यावश्यक सेवाच सुरु राहणार आहेत. तसंच तीन टप्प्यात देशभरातील सेवा सुरु करण्याचा सरकारचा विचार आहे. यासंदर्भात आजच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सविस्तर बोलतील, अशी अपेक्षा आहे.
पहा मन की बात लाईव्ह स्ट्रीमिंग
दरम्यान, 'मन की बात' हा रेडिओ प्रोग्रॅम ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनवर वर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होतो. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी लेटेस्ट घडामोडी, समस्या यासंदर्भात जनतेशी संवाद साधतात. मागील कार्यक्रमातही मोदींनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जागरुक राहण्याचा सल्ला दिला होता.आजच्या मन की बात कार्यक्रमात देशातील कोरोना स्थितीबाबत आणि लागु करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या बाबत मोदी बोलण्याची शकयता आहे.