Man Kills Daughter in Gwalior: आंतरजातीय प्रेमाला विरोध करत बापाने पोटच्या मुलीला संपवले; ग्वालियरमधील घटना

बापाने मुलीला समजवलं. मुलगी लग्न करण्याचा हट्टावर कायम होती. त्यानंतर शुक्रवारी रात्री बापाने मुलीची हत्या केली.

Murder | Representational image (Photo Credits: pixabay)

मध्य प्रदेशच्या मध्ये आंतरजातीय प्रेमाला विरोध करत बापाने पोटच्या मुलीची हत्या केल्याची घटना घडली आहे. बापाने पोटच्या मुलीला गळा दाबून संपवलं. या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या बापाला अटक केली आहे. मध्य प्रदेशच्या ग्वालियर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या व्यक्तीने पोटच्या मुलीला संपवलं आहे. मुलीच्या प्रेमाला कुटुंबाचा विरोध होता. मुलगी इतर जातीतील मुलाच्या प्रेमात पडली होती. कुटुंबाच्या विरोधानंतरही मुलगी ही प्रियकराच्या संपर्कात होती. यामुळे शुक्रवारी बाप आणि मुलीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर संतापलेल्या बापाने शुक्रवारी मुलीची गळा दाबून हत्या केली.  (हेही वाचा - Bomb Threat: गुरुग्रामच्या ॲम्बियन्स मॉल आणि नोएडाच्या DLF मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, घटनास्थळी पोलिस उपस्थित (पहा व्हिडिओ))

मुलीच्या हत्या झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्वालियर पोलिसांनी या हत्ये प्रकरणी तपास सुरु केला आहे. ग्वालियर शहरातील गिरवाई भागात राहणाऱ्या एका मुलीला प्रेमामुळे जीव गमावण्याची वेळ आली आहे. आंतरजातीय प्रेम केल्याने बापाने मुलीची हत्या केली. बापाने हत्या केल्यानंतर स्वत: पोलीस ठाण्यात पोहोचला.

कुटुंबाने मुलीच्या प्रेमाला विरोध केला. बापाने मुलीला समजवलं. मुलगी लग्न करण्याचा हट्टावर कायम होती. त्यानंतर शुक्रवारी रात्री बापाने मुलीची हत्या केली. त्यानंतर बाप पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला.  पोलीस स्टेशनमध्ये पोहोचून मुलीची हत्या केल्याचे कबुल करत अटक करण्यास सांगितलं. यामुळे पोलीस कर्मचारी चकीत झाले. पोलीस तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घराच्या अंगणात मुलीचा मृतदेह सापडला.