Delhi Vidhansabha Elections Results 2020: 'भाजप'च्या भ्रमाचा भोपळा फुटला'; उद्धव ठाकरे यांनी केजरीवाल यांना शुभेच्छा देत BJP वर साधला निशाणा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आप आणि अरविंद केजरीवाल यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या, याच वेळी भाजपवर निशाणा साधताना, दिल्लीच्या नागरिकांनी काही ज्यांच्या भ्रमाचा भोपळा फोडला आहे, दिल्ली वासियांनी जन की बात ऐकली तिथे मन की बात चालली नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणूक (Delhi Vidhansabha Elections Results) निकालात आप (AAP) आणि अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी दणदणीत विजय मिळवत तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर आपले नाव कोरले आहे. या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आप आणि अरविंद केजरीवाल यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या, याच वेळी भाजपवर निशाणा साधताना, दिल्लीच्या नागरिकांनी काही ज्यांच्या भ्रमाचा भोपळा फोडला आहे, दिल्ली वासियांनी जन की बात ऐकली तिथे मन की बात चालली नाही, भाजपने केजरीवाल यांना दहशतवादी ठरवले पण त्यांनीच भाजप (BJP) चा पराभव केला असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले आहे.
दुसरीकडे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी सुद्धा दिल्लीतील रहिवाशांनी निर्भीडपणे घराबाहेर पडून आप साठी मतदान केले आहे असे म्हणत केजरीवाल यांना शुभेच्छा देतानाच दिल्लीवासियांचे कौतुक केले आहे. अरविंद केजरीवाल यांनी काही वेळापूर्वी दिल्ली येथून प्रकटपणे रहिवाश्यांच्या आभार मानता हा माझा नव्हे तर देशाचा विजय आहे अशी प्रतिक्रिया दिली होती.
पहा ट्विट
आदित्य ठाकरे ट्वीट
उद्धव ठाकरे यांच्या या विधानावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रया देताना, आता एव्हेईमच्या नावाने बोंबलणारे कुठे गेले असा सवाल केला आहे. दिल्लीत जरी भाजपचा पराभव होत असला तरी मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजप प्रगतीपथावरच आहे असे शेलार यांनी म्हंटले तर आपला मागील निवडणुकीच्या तुलनेत कमी जागा मिळवता आल्या तर काँग्रेसचे संपूर्ण मुळच नष्ट झाले आहे असे सुद्धा शेलार यांनी उत्तर दिले आहे.
दरम्यान, देशातील अनेक प्रादेशिक नेत्यांनी सुद्धा अरविंद केजरीवाल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यात राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून ते सुप्रिया सुळे, सचिन पायलट, ममता बॅनर्जी ते अगदी भाजपच्या गौतम गंभीर, कपिल मिशारा यांनी सुद्धा केजरीवाल यांना शुभेच्छा दिल्या आहेत.