मध्य प्रदेश: जातीबाहेरील तरुणासोबत विवाहबाह्य संबंध; पत्नीला दिली पतीला खांद्यावर घेऊन चालण्याची शिक्षा (Viral Video)

लग्नानंतरही जातीबाहेरील तरुणासोबत अनैतिक संबंध असलेल्या महिलेला गावकऱ्यांनी एक आगळीवेगळी शिक्षा दिली.

Villagers force a woman to carry her husband on her shoulders as a punishment (Photo Credits: ANI/Twitter)

लग्नानंतरही जातीबाहेरील तरुणासोबत अनैतिक संबंध असलेल्या महिलेला गावकऱ्यांनी एक आगळीवेगळी शिक्षा दिली. महिलेने पतीला खांद्यावर उचलून घेत चालण्याची शिक्षा गावकऱ्यांनी दिली. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) भोपाळ (Bhopal) मधील झबुआ (Jhabua) गावात हा सर्व धक्कादायक प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत महिला पतीला खांद्यावर घेऊन चालताना दिसत आहे. महिला खूप दमलेल्या थांबली असता गावकऱ्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे दमलेल्या त्या महिलेला पुन्हा चालण्यावाचून गत्यंतर उरले नाही.

ANI ट्विट:

धक्कादायक प्रकाराचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणाची दखल घेत दोघांना अटक केली आहे. तसंच या प्रकरणाची अधिक चौकशी करत इतर आरोपींनाही लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif