Arrest. Representational Image. (Photo Credit: ANI)

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) विदिशामध्ये एका 24 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. हा तरुण अनेक मोबाइल अ‍ॅप्सवर आपल्या दोन पत्नींसह केलेल्या सेक्सचे लाईव्ह स्ट्रीमिंग (Sex Live Streaming) करत असे. हा सेक्सचा लाइव्ह शो पाहण्यासाठी लोक त्याला पैसे द्यायचे. असे सांगितले जात आहे की, याद्वारे या तरुणाने लाखो रुपये कमावले आहेत. शनिवारी त्याच्या दुसर्‍या पत्नीने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. पत्नीने त्याच्यावर बलात्कार, गोपनीयतेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.

हा तरुण केवळ दहावीपर्यंत शिकला आहे, मात्र तंत्रज्ञानाचे त्याला चांगलेच ज्ञान आहे. तो स्वत: अनेक डेटिंग अॅप्सवर सक्रिय होता व अशा साइटवर कंटेंट टाकून पैसे कसे कमवायचे हे त्याला माहित होते. त्याच्या पहिल्या पत्नीने कोणतीही तक्रार दिली नाही. कदाचित या महिलेला त्याने चांगल्या भविष्याची स्वप्ने दाखवून तिला भ्रमित केले असावे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

एका पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले, या व्यक्तीने अ‍ॅप्सवर डीपी लावला होता, जी व्यक्ती हा डीपी लाईक करत असे, त्याला मेन्यूसह मेसेज पाठविला जायचा. हा तरुण डेमोसाठी 100 रुपये आकारत असे आणि वेगवेगळ्या क्लिपसाठी 500, 700 ते 1000 रुपयांपर्यंत शुल्क आकारत असे. सेक्सच्या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये चेहरा दाखवणे व चेहरा न दाखवणे यासाठी वेगवेगळे शुल्क आकारले जायचे. 28 ऑगस्ट रोजी उघडलेल्या त्याच्या एका बँक खात्यात 6 लाख रुपयांचे व्यवहार आहेत. विश्वास आहे की तो दिवसाला 3 ते 4 हजार रुपये कमावत होता.

तपासात करणाऱ्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीची पहिली पत्नी बंगळुरुची आहे. ती सात महिन्यांची गरोदर आहे. त्यांची सोशल मीडियावर भेट झाली आणि त्यानंतर दोघांचे लग्न झाले. आरोपीची दुसरी पत्नी उत्तर प्रदेशची असून ती आध्यात्मिक वृत्तीची आहे. ती एका धार्मिक गुरूची अनुयायी आहे आणि आरोपीने स्वत: ला त्याच गुरूचा अनुयायी असल्याचे सांगत या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले व काही दिवसांच्या मैत्रीनंतर त्यांनी मंदिरात लग्न केले.

चौकशीदरम्यान आरोपीने कबूल केले की, तो दोन्ही बायकांसह सेक्सचे लाईव्ह स्ट्रीमिंग करत असे. आरोपींचे फोन, बँकेचे तपशील आणि 12 लाख रुपयांचे दागिने जप्त केले आहेत.