Lalji Tandon Passes Away: मध्यप्रदेश चे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन; राष्ट्रपती रामनाथ कोविंंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ यांनी वाहिली श्रद्धांंजली
यानंंतर, राष्ट्रपती रामनाथ कोविंंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करुन श्रद्धांंजली वाहिली आहे.
मध्यप्रदेशचे (Madhyapradesh) राज्यपाल लालजी टंडन (Governor Lalji Tandon) यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले आहे. मागील महिन्याभरापासून लालजी टंडन यांच्या तब्येतीत बिघाड होत होता. 16 जुलै पासून त्यांची तब्येत अगदीच ढासळत गेली आणि शेवटी आज त्यांचे देहावसान झाले आहे. त्यांचे सुपुत्र आशुतोष टंडन यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. 'बाबुजी नही रहे' असं त्यांचं आज (21 जुलै) सकाळचं ट्वीट आहे. यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंंद ,पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी ट्विट करून लालजी टंडन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. योगी आदित्यनाथ यांनी लालजी टंडन यांच्या निधनानंतर उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) 3 दिवसांचा दुखवटा सुद्धा जाहीर केला आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मध्य प्रदेशचे राज्यपाल श्री. लाल जी टंडन यांच्या निधनानंतर, आपण एक दिग्गज नेता गमावला आहे, ज्यांनी लखनौच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक प्रगती साठी अतोनात काम केले त्यांच्या निधनाबद्दल मी शोक व्यक्त करतो असे ट्विट केले आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद ट्विट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, "लालजी टंडन यांना संविधान संबंधित अफाट ज्ञान होते त्यांनी बराच काळ अटल जी (अटल बिहारी वाजपेयी) यांच्या सोबत घालवला आहे, त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो."
नरेंद्र मोदी ट्विट
तर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुद्धा ट्विटच्या माध्यमातून लालजी टंडन यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
योगी आदित्यनाथ ट्विट
मागील काही दिवसांपासून भोपाळमध्ये खाजगी रूग्णालयात लालजी टंडन यांच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार सुरु होते. मेदांता हॉस्पिटलकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, त्यांची फुफ्फुसं, किडनी, लिव्हर अपेक्षेप्रमाणे काम करत नव्हती. सुरुवातीला त्यांना मूत्रविसर्जनाशी निगडीत त्रास आणि ताप होता. त्यानंतर यकृत आणि युरिन इंफेक्शनचा त्रास असल्याचं समोर आलं, यानंतर त्यांची एक शस्त्रक्रिया सुद्धा पार पडली होती.
दरम्यान लालजी टंडन यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मध्य प्रदेशच्या राज्यपालपदाचा अधिभार उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे काही दिवसांपूर्वी अतिरिक्त प्रभार म्हणून सोपवण्यात आला होता