Madhya Pradesh: गरब्यावरुन बहिणीसोबत घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात गरबा पाहून झाल्यानंतर घरी परतत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Madhya Pradesh: गरब्यावरुन बहिणीसोबत घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात गरबा पाहून झाल्यानंतर घरी परतत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेने असे म्हटले की, आरोपींनी सामूहिक बलात्कार केल्यानंतर याबद्दल कोणाला सांगितल्यास तिला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. या प्रकरणी दोन आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीवरुन आता आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

धार जिल्ह्यातील गंधवानी ठाणे परिसरातील ही घटना आहे. आरोपींनी बलात्कार केल्यानंतर घटनास्थळावरुन पळ काढला असून आता ते फरार आहेत. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, गरबा पाहून घरी येत असलेल्या अल्पवयीन मुलीला दोन अज्ञात व्यक्तींना अडवत तिला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला.(Hyderabad Suicide Case: हैदराबादमध्ये पतीने दसऱ्यासाठी माहेरी न जावू दिल्याने 26 वर्षीय पत्नीने संपवलं आयुष्य, आरोपीवर गुन्हा दाखल)

पीडिता आपल्या घरी पोहचल्यानंतर तिने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार घरातल्यांना सांगितला. त्यानंतर घरातील मंडळींनी लगेच तिला घेऊन पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली. आरोपी चना आणि गोविंद यांच्या विरुद्ध पॉक्सो आणि एससी-एसटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, पोलिसांच्या मते अल्पवयीन पीडिता आपल्या चुलत बहिणीसोबत घरी रात्री 11 वाजता येत होती. तेव्हाच आरोपींनी त्यांची रस्त्यात अडवणूक केली. त्यानंतर चुलत बहिणीवर दगडफेक करत तिला तेथून पळवून लावले आणि अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. आरोपींना लवकरच ताब्यात घेतले जाईल असे पोलिसांनी म्हटले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Oct 15, 2021 10:33 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).