Made in Heaven 2: या दिवशी रिलीज होणार 'मेड इन हेवन 2' चा ट्रेलर; झोया अख्तरने पोस्ट शेअर करत दिली माहिती

या शोच्या पहिल्या सीझनमध्ये शोभिता धुलिपाला, अर्जुन माथूर, जिम सरभ आणि कल्की केकलन सारखे स्टार्स दिसले होते. या वेब सिरीजचा आशय प्रेक्षकांना खूप आवडला होता. हा सीझन सुपरहिट तर होताच, पण त्याला एमी अवॉर्डसाठी नामांकनही मिळाले आहे. 'मेड इन हेवन' दिल्लीतील एका वेडिंग प्लॅनरच्या कथेवर आधारित आहे.

Made in Heaven 2: या दिवशी रिलीज होणार 'मेड इन हेवन 2' चा ट्रेलर; झोया अख्तरने पोस्ट शेअर करत दिली माहिती
Made in Heaven 2 (PC- Instagram)

Made in Heaven 2: 2019 साली आलेली 'मेड इन हेवन' (Made in Heaven)ही वेब सिरीज प्रेक्षकांना खूप आवडली होती. आता या सीरिजचा दुसरा सीझन चर्चेत आहे. अलीकडेच झोया अख्तरने या लोकप्रिय सीरिजच्या दुसऱ्या भागाच्या ट्रेलर लॉन्चची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. झोयाने इंस्टाग्रामवर स्टार्सच्या लूकच्या पोस्टर्सची मालिका शेअर करून ट्रेलर रिलीजची तारीख जाहीर केली आहे.

शोच्या निर्मात्या झोया अख्तरने शोभिता धुलिपाला, कल्की केकलान, जिम सरभ आणि मोना सिंग यांचे पोस्टर शेअर केले आहेत. पोस्टर्ससोबतच ट्रेलर लॉन्च डेटचाही उल्लेख करण्यात आला आहे. सीरिजचा ट्रेलर उद्या म्हणजेच 1 ऑगस्ट 2023 रोजी लाँच होणार आहे. या सीरिजची रिलीज डेटही समोर आली आहे. मेड इन हेवन सीझन 2 वेब सीरिज 10 ऑगस्ट रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होईल. (हेही वाचा - Jawan First Song Zinda Banda: शाहरुख खानचा जवान चित्रपटातील 'जिंदा बंदा' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, डान्स बघून चाहते घायाळ (Watch Video))

या शोच्या पहिल्या सीझनमध्ये शोभिता धुलिपाला, अर्जुन माथूर, जिम सरभ आणि कल्की केकलन सारखे स्टार्स दिसले होते. या वेब सिरीजचा आशय प्रेक्षकांना खूप आवडला होता. हा सीझन सुपरहिट तर होताच, पण त्याला एमी अवॉर्डसाठी नामांकनही मिळाले आहे. 'मेड इन हेवन' दिल्लीतील एका वेडिंग प्लॅनरच्या कथेवर आधारित आहे. ही मालिका भारतीय विवाहाच्या पार्श्‍वभूमीवर परंपरा आणि आधुनिक आकांक्षा यांचा संघर्ष सादर करते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zoya Akhtar (@zoieakhtar)

या सीरिजमध्ये सात भाग असतील. झोया अख्तरच्या पोस्टवर यूजर्स भरपूर कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'प्रतिभावान लोकांना व्यासपीठ दिल्याबद्दल झोयाचे कौतुक केले पाहिजे. तुम्ही नेहमीच उत्कृष्टपणे कलाकार निवडता.' आणखी एका यूजरने लिहिले की, 'सर्व स्टार्स शानदार दिसत आहेत. आम्ही मालिका पाहण्याची वाट पाहत आहोत.'

(The above story first appeared on LatestLY on Jul 31, 2023 04:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).