Delhi Hindi Academy: गीतकार स्वानंद किरकिरे दिल्ली हिंदी अकादमी उपाध्यक्ष पदावर नियुक्त
दिल्लीचे उपमुख्यमंही आणि हिंदी अकादमीचे अध्यक्ष मनीष सिसोदिया यांनी गुरुवारी अकादमीच्या पहिल्या गवर्निंग बॉडी बैठकीत ही नियुक्ती केली.
प्रसिद्ध गीतकार आणि लेखक स्वानंद किरकिरे (Swanand Kirkire) यांची दिल्ली हिंदी अकादमी (Delhi Hindi Academy) उपाध्यक्ष पदावर निवड झाली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंही आणि हिंदी अकादमीचे अध्यक्ष मनीष सिसोदिया यांनी गुरुवारी अकादमीच्या पहिल्या गवर्निंग बॉडी बैठकीत ही नियुक्ती केली. स्वानंद किरकीरे यांचा अनुभव आणि प्रतिभा अकादमीला भाषा आमि संस्कृतीचा प्रसार करण्यात मोठा हातभार लावेन. या वेळी बोलताना सिसोदीया यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस महामारीमुळे लोकांच्या आयुष्यात मोठा तणावत्मक संघर्ष निर्माण झाला आहे. त्यामुळे लोकांना पुन्हा एकदा कला, संस्कृती आणि मनोरंजनाकडे वळवायला हवे. जेणेकरुन त्यांचा ताण कमी होईल.
स्वानंद किरकिरे हे भारतीय गायक आणि पार्श्वगायक, लेखक आहेत. त्यांनी अनेक हिंदी चित्रपट, मालिकांसाठी कथानक लिहिले आहे. त्यासोबतच सहाय्यक दिग्दर्शक, संवाद लेखन ही केले आहे.
किरकिरे यांना दोन वेळा उत्कृष्ठ लेखनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. लगे रगो मुन्नाभाई चित्रपटातील "बंदे में था दम...वन्दे मातरम" या गितासाठी 2007 मध्ये पहिल्यांदा पुरस्कार मिळाला. त्यानंतर आलेल्या अमिर खान याच्या थ्री एडीएट्स चित्रपटातील "बहती हवा सा था वो..." या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला आहे. (हेही वाचा, Suyash Tilak Engagement Photos: अभिनेता सुयश टिळक ने लेडी लव्ह आयुषी भावे सोबत केला साखरपुडा; इथे पहा फोटोज)
दरम्यान, स्वानंद किरकीरे यांचा अनुभव कोरोनामुळे तणावग्रस्त झालेल्या लोकांना बाहेर काढण्याकामी आकादमीसाठी फायदेशीर ठरेन. कोरोना काळात आम्हाला नव्या संकल्पना रुजवाव्या लागतील. नव्याने जीवनाचा आनंद शोधावा लागेल. त्यासाठी नव्या आव्हानांचा सामना मोठ्या धीराने करावा लागेल. त्यामुळे या आव्हानांना डोळ्यासमोर ठेऊन अकादमीने आपल्या कार्यक्रमक आणि उपक्रमांमध्ये काळानुरुप बदल केले आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी अकादमीच्या पदाधिकाऱ्यांना नव्या दिशानिर्देशांनुसार काम करण्याचे निर्देश दिले.
उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अध्यक्षतेत दिल्ली हिंदी अकादमी हिंदी भाषा, साहित्य आणि संस्कृती वाढविण्यासाठी तिला चालना देण्यासाठी कार्य करते. या कार्यासाठीच ही अकादमी प्रतिबद्ध आहे. दिल्लीतील हिंदी अकादमी साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी सन्मान योजनेच्या माध्यमातून सन्मान, पुरस्कार देते. तसेच, आकदमी हिंदी पंधरवडा, राष्ट्रीय कवी संमेलन, संगोष्टी यांसारख्या सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन आणि प्रसार करते.