LPG Cylinder Price Hike: एलपीजी सिलिंडर महागला; सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी सर्वसामांन्यांचा महागाईचा फटका

नव्या दरांनुसार तेल वितरण कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती 39 रुपयांनी वाढवल्या आहेत.

LPG Cylinder | (Photo Credits: Latestly)

LPG Price News: सामान्यांना महागाईचा फटका आज सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी बसणार आहे. कारण, गॅस सिलेंडरचे दर आजपासून पुन्हा वाढले (Cylinder Price Hike)आहेत. नव्या दरांनुसार तेल वितरण कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या (Commercial LPG Cylinder)किमती 39 रुपयांनी वाढवल्या आहेत. नवीन दर रविवार म्हणजेच 1 सप्टेंबर 2024 पासून लागू झाले आहेत. या वाढीनंतर राजधानी दिल्लीत 19 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 1,691.50 रुपये झाली आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (OMCs) 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केली आहे, पण घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. (LPG Cylinder Price Hike: एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 25 रूपयांची वाढ; 17 ऑगस्ट पासून लागू राहतील नवे दर)

या वाढीनंतर राजधानी दिल्लीत 19 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 1,691.50 रुपये झाली आहे. सध्या राजधानी दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 803 रुपये आहे. आर्थिक राजधानी मुंबईत घरगुती एलपीजीची किंमत 802.5 रुपये आहे. तर, व्यावसायिक गॅस सिलेंडर मुंबईत 1644 रुपये झाली आहे. चेन्नईमध्ये घरगुती गॅस सिलिंडर 918.5 रुपयांना विकला जात आहे. कोलकातामध्ये 14 किलोचा सिलेंडर 829 रुपयांना विकला जात आहे. मुंबईत एलपीजीची किंमत 802.5 रुपये आहे. तर, पाटण्यात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 1947 रुपये आहे, तर जयपूरमध्ये 19 किलोचा सिलेंडर 1719 रुपयांना विकला जात आहे.

दरम्यान, तेल कंपन्यांनी इंधनांच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. पेट्रोल-डिझेलचे होते तेवढेच ठेवले आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 103.44 रुपये तर डिझेलचा दर 89.97 रुपये प्रतिलिटर आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल 94.72 रुपये प्रतिलिटर विकले जात आहे. तर, डिझेलचा दर 87.62 रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 104.95 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 91.76 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 100.75 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 92.34 रुपये प्रति लिटर आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif