LPG Cylinder Price Hike: एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 25 रूपयांची वाढ; 17 ऑगस्ट पासून लागू राहतील नवे दर

तर कोलकाता (Kolkata)मध्ये हाच सिलेंडर Rs 886 आणि दिल्ली (Delhi) मध्ये Rs 859.5 झाला आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (फाइल फोटो )

Liquefied Petroleum Gas सिलेंडरच्या किंमती देशामध्ये 25 रूपयांनी वाढल्या असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. दरम्यान यामुळे पुन्हा गृहिणींच्या बजेटमध्ये महागाईची फोडणी बसली आहे. नव्या दरवाढीनुसार, मुंबई (Mumbai) मध्ये 14.2 kg LPG गॅस सिलेंडरची किंमत Rs 834.50 वरून आता Rs 859.5 इतकी झाली आहे. तर कोलकाता (Kolkata)मध्ये हाच सिलेंडर Rs 886 आणि दिल्ली (Delhi)  मध्ये Rs 859.5 झाला आहे. ही दरवाढ विना अनुदानित गॅस सिलेंडर साठी असेल. (नक्की वाचा: तुम्हाला LPG Cylinder वर Subsidy मिळते की नाही? काही मिनिटांत करू शकता चेक; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया).

दरम्यान राज्यात ऑईल कंपन्यांकडून एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत प्रत्येक नव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी जाहीर करते. यापूर्वी घरगुती गॅस सिलेंडरची किंमत जुलै 2021 मध्ये वाढवण्यात आली होती. जुलै महिन्यात तो 834 रूपये होता. आता 1 जानेवरी ते 17 ऑगस्ट या कालावधीमध्ये कुकिंग गॅस सिलेंडरची किंमत तब्बल 165 रूपयांनी वधारली आहे.

ANI Tweet

पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस यांच्यामध्ये सातत्याने होत असलेली मागील काही महिन्यातील वाढ राजकारणाचा मुद्दा झाला आहे. सरकारने त्यावर उत्तर देताना हे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतींवर अवलंबून असतात असे म्हटलं आहे त्यामुळे त्यांच्या हातात दरांविषयी फार काही नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. सोमवारी रात्री 10 च्या सुमारास नव्या दरांची माहिती देत आता मंगळवार म्हणजे 17 ऑगस्ट पासून घरागुती गॅसचे नवे दर लागू राहतील असे सांगण्यात आले आहे.