Parliament Security Breach Updates: संसद सुरक्षा भंग प्रकरणी सात कर्मचारी निलंबीत
या प्रकरणात झालेल्या पहिल्या कारवाईमध्ये संसदेच्या सेक्रेटरीसह सात कर्मचाऱ्यांन निलंबीत केले आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान दोन तरुणांनी लोकसभा सभागृहात केलेली घुसखोरी आणि सुरक्षा व्यवस्थेत झालेली गंभीर चूक (Lok Sabha Security Breach) केंद्र सरकारने गांभीर्याने घेतली आहे. या प्रकरणात झालेल्या पहिल्या कारवाईमध्ये संसदेच्या सात कर्मचाऱ्यांना निलंबीत केले आहे. धक्कादायक म्हणजे सुरक्षेतील चूक ही बावीस वर्षांपूर्वी सन 2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्याच्या स्मृतीदिनीच पुन्हा एकदा घडली आहे. संसदेवरील हल्ल्यात शहीद झालेल्यांचा 22 वा स्मृतीदिन देशात पाळला जात असतानाच अशी घटना घडणे ही अत्यंत खेदाची बाब मानली जात आहे. ही चूक म्हणजे यंत्रणांकडून घडलेला अक्षम्य गुन्हा असल्याचेही विरोधकांनी म्हटले आहे.
संसदेच्या लोकसभा प्रेक्षागृहात आलेल्या दोन तरुणांनी अचानक सभागृहात उडी घेतली. सागर शर्मा आणि मनोरंजन डी अशी या तरुणांची नावे असल्याचे पुढे आले आहे. ही घटना बुधवारी घडली. या दोघांनी संसदेत प्रवेश केला आणि धुराचे नळकांडे फोडले. तर यांच्या दोन साथीदारांनी संसदेबाहेर जोरदार घोषणाबाजी करत धुराची नळकांडी फोडली. ये सर्वजण भारत माता की जय, तानाशाही नही चलेगी, अशा घोषणा देत होते. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, लोकसभा सभागृहात घुसलेल्या घुसखोरांनी डब्यातून पिवळा वायू सोडला, त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. ही घटना सुरक्षा प्रोटोकॉलची असुरक्षितता आणि भविष्यात अशा उल्लंघनांना प्रतिबंध करण्यासाठी वाढीव दक्षतेची गरज अधोरेखित करते, असे विरोधकांनी म्हटले आहे. दरम्यान, सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. असे कृत्य करण्यापाठीमागचा त्यांचा उद्देश आणि त्यांनी हे कृत्य कोणाच्या सांगण्यावरुन केले याबाबत पोलीस तपास सुरु आहे. (हेही वाचा, Lok Sabha Security Breach: संसदेतील घुसखोराला खासदारांनी केली मारहाण; समोर आला व्हिडिओ (Watch))
एक्स पोस्ट
प्राप्त माहितीनुसार, पोलीस तपासात पुढे आले आहे की, चारही आरोपी पाठमागील जवळपास दोन ते अडीच वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात आहेत. हे सर्व आरोपी सरकारचे बेरजगारी, महागाई याकडे लक्ष वेधण्यासाठी काहीतरी मोठ्या प्रमाणावर करायचे याचा विचार करत होते. त्यातून त्याच्या अनेक बैठका पार पडल्या होत्या. तसेच, त्यांनी त्यासाठी निश्चित कटही आखला होता. त्यातूनच त्यांनी हे कृत्य केल्याचे प्राथमिक माहितीमध्ये पुढे आले आहे. दरम्यान, पोलीस तपास अद्यापही सुरुच आहे. त्यामुळे तपास जजजसा गती घेईल तसतशी अधिक माहिती पुढे येण्याची शक्यता आहे.