IPL Auction 2025 Live

मतदानावेळी महिलांनी परिधान केलेला बुरखा उतवरण्यास आग्रह, कम्युनिस्ट नेत्यावर जोरदार टीका

कारण या बुथवर बोगस मतदान झाले असल्याचा आरोप करण्यात आला होता.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) सातव्या टप्प्यातील मदातनावेळी केरळ (Kerala) मधील 7 पोलिंग बुथवर पुनर्मतदान करण्यात येत आहे. कारण या बुथवर बोगस मतदान झाले असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून पुन्हा आज मतदान पार पडत आहे. दरम्यान मतदानावेळी महिलांनी परिधान केलेला बुरखा उतवरण्यासाठी कम्युनिस्ट नेत्याने आग्रह केला. यावरुन वाद निर्माण झाला असून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे.

सीपीआय(एम) नेते आणि कन्नुरमधील पक्षाचे जिल्हा सचिव एम. व्ही. जयराजन यांनी महिलांनी परिधान केलेल्या बुरख्याबद्दल वादग्रस्त विधान केले. त्यावेळी त्यांनी असे म्हटले आहे की, महिलांनी बुरखा घालून मतदान करत असल्याचे दिसून आल्यास त्यांच्याकडून बोगस मतदान केले जाते असे आक्षेपार्ह विधान केले. त्यामुळे कन्नुर येथे मोठ्या प्रमाणात असलेल्या मुस्लिम समुदायाने याबद्दल संताप व्यक्त केला आहे.(मतदानापूर्वी EVM मशीनचे सील उघडल्याने निवडणूक अधिकाऱ्यावर कारवाई)

मात्र या विधानानंतर जयराजन यांनी यु-टर्न घेत महिलांनी बुरखा घालून मतदान करणे हे वाईट नसल्याचे म्हटले आहे. परंतु जर पोलिंग एजंट यांनी बुरखा उतरवण्यास सांगितल्यास तसे करावे असे सुद्धा जयराजन यांनी म्हटले आहे.