Lok Sabha Election 2024: केरळात सीबीआय आणि ईडीच्या कारवाईवरून राहुल गांधीचे केंद्र सरकारवर टीकास्त्र

ते म्हणाले, सत्तारूढ पक्ष देशावर एक देश, एक भाषा, एक इतिहास लादू इच्छित आहे.

Rahul Gandhi | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भाजपा  देशांतील जनतेवर एक इतिहास, एक देश, एक भाषा लादू इच्छित आहे. पण भाजपचे मनुसबे कधीही यशस्वी होणार नाहीत. या स्थितीपासून देशातील जनतेला वाचविण्याचा कॉंग्रेसने निर्धार केला आहे, ’’ असे कॉंग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. केरळच्या कन्नूर येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सीबीआय आणि ईडीच्या कारवाईवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकीवरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.  (हेही वाचा - PM Modi Hasn't Taken Single Leave: पीएम नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षांत घेतली नाही एकही दिवसाची रजा; 65,700 तास केले काम)

पाहा पोस्ट -

आज कन्नूरच्या सभेत राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, सत्तारूढ पक्ष देशावर एक देश, एक भाषा, एक इतिहास लादू इच्छित आहे. पण या गोष्टीपासून कॉंग्रेस पक्ष देशाला वाचवत आहे. केरळ आणि तमिळनाडूत येऊन यापुढे आता देशात एकच भाषा असेल असे कोणी बोलले तर चालेल का? भाजपने ईडी आणि सीबीआयला विरोधी पक्ष नेत्यांविरुद्ध शस्त्र म्हणून वापरल्याचा आरोप राहुल गांधीनी केला आहे.

पंतप्रधानांनी अलीकडेच तमिळनाडूत येऊन डोसा आवडत असल्याचे म्हटले. मलाही डोसा आवडतो. परंतु राज्याचा विचार करणे गरजेचे आहे. भारत कधीही बदलू शकत नाही आणि यात पंतप्रधान वेळ वाया घालवत आहेत. मोदी हे देशांत अशांतता निर्माण करू इच्छित आहेत.लोकांचे मन दुखवायचे आहे.’’ असा आरोप राहुल गांधींनी केला