Lok Sabha Election 2024: शरद पवार, प्रशांत किशोर यांच्यात दिल्ली येथे भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधान; विरोधकांचे मिशन 2024?

अवघ्या 10 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा अशा प्रकारची भेट झाली. या भेटीने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा आणि तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत.

Sharad Pawar, Prashant Kishor | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि प्रसिद्ध राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्यात सोमवारी (21 जून) पुन्हा एकदा भेट झाली. अवघ्या 10 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा अशा प्रकारची भेट झाली. या भेटीने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा आणि तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. पवार आणि किशोर यांच्यात दिल्ली येथे ही भेट झाली. या भेटीचा हवाला देत प्रसारमाध्यामांमध्ये चर्चा आहे की, विरोधकांनी मिशन 2024 हाती घेतले असून त्या दृष्टीने राजकीय रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. असेही बोलले जात आहे की, लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात शरद पवार हा चेहरा विरोधकांकडून मैदानात उतरवला जाऊ शकतो. त्यामळे प्रशांत किशोर यांच्यासोबतच्या पवार यांच्या चर्चेला अधिक महत्त्व आले आहे.

प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्ता म्हटले आहे की, शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात साधारण 3 तास बैठक चालली. या बैठकीनंतर शरद पवार अथवा प्रशांत किशोर यांनी कोणत्याही प्रकारचे अधिकृत विधान केले नाही. परंतू, राजकीय वर्तुळात मात्र शक्यता, चर्चा आणि तर्कांना उत आला आहे. राजकीय वर्तुळात चर्चा आहे की या बैठकीत शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली विरोधक लोकसभा निवडणूक 2024 महागठबंधन करुन लढविण्यावर चर्चा झाली. शरद पवार यांच्या कार्यालयाकडून मात्र ही एक अनौपचारीक भेट असल्याचे म्हटले आहे. (हेही वाचा, शरद पवार दिल्लीत दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण)

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात मुंबई येथे नुकतीच (11जून) एक बैठक पार पडली होती. ही बैठक पवार यांचे मुंबई येथील निवासस्थान सिल्वर ओक येथे पार पडली होती. या दोन्ही व्यक्तिमत्वांमध्ये होत असलेल्या वारंवारच्या भेटीमुळे ही लोकसभा निवडणूक 2024 ची तयारी असल्याची चर्चा आहे. दुसऱ्या बाजूला अशीही चर्चा आहे की, राजधानी दिल्लीसोबतच देशभरातील विविध घटकराज्यांमध्येही विरोधकांची एकजूट बांधण्यावर भर दिला जात आहे.

दरम्यान, प्रशात किशोर यांनी आतापर्यंत नरेंद्र मोदी, जगन मोहन रेड्डी, कैप्टन अमरिंदर सिंह, ममता बनर्जी आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी राजकीय रणनितीकार म्हणून काम केले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif