Lingayat Mutt Sex Scandal: प्रशासक मागे घ्या नाहीतर आंदोलनाला सामोरे जावे लागेल, संतांचा कर्नाटक सरकारला इशारा
या बैठकीत संतांनी कर्नाटकातील सत्ताधारी भाजपला मठासाठी प्रशासक नेमण्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे.
चित्रदुर्ग मुरुघा मठात (Chitradurga Murugha Mutt) मंगळवारी (20 डिसेंबर) 40 हून अधिक संतांच्या एका गटाची बैठक पार पडली. या बैठकीत संतांनी कर्नाटकातील सत्ताधारी भाजपला मठासाठी प्रशासक नेमण्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे. मठाचे प्रभारी बसवप्रभू श्री यांनी बैठकीनंतर सांगितले की, “आम्ही मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना हात जोडून विनंती करतो की त्यांनी मठावर प्रशासक नेमण्याचा निर्णय मागे घ्यावा”.
रकारने नकार दिल्यास संत 26 डिसेंबरला चित्रदुर्ग किंवा बेळगावी येथे धरणे धरतील. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुरुघा यांना मुखत्यारपत्र देण्यात आले आहे. मठाचा कारभार आता सुरळीत चालला आहे, असे बसवप्रभू श्री म्हणाले. सरकारने संतांच्या रक्षणासाठी कायदे तयार करावेत अन्यथा जोखीम लक्षात घेऊन कोणीही संत होण्यासाठी पुढे येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होईल, असा दावा त्यांनी केला. (हेही वाचा, Imran Khan Lands in ‘Sex Call’ Controversy: इमरान खान यांचे 'सेक्स कॉल' प्रकरण वादात, महिलेने कथीतरित्या म्हटले 'माझा *** दुखतो आहे')
कट रचणारे कायद्याचा गैरवापर करत आहेत. POCSO कायद्याचाही गैरवापर झाला आहे. प्रशासकाची नियुक्ती रद्द करावी, असे ते म्हणाले. कर्नाटक सरकारने एका आठवड्यापूर्वी बलात्काराचे आरोपी द्रष्टा शिवमूर्ती मुरुघा शरनारू यांच्या जागी चित्रदुर्गातील जगदगुरू मुरुगराजेंद्र ब्रुहनमुत्त यांच्यासाठी प्रशासक नेमला होता.