अनिल अंबानी म्हणाले, 'मी दिवाळखोरीत, माझ्याकडे फुटकी कवडीही नाही'

न्यायाधीश डेव्हिड वाक्समैन यांनी 7 अब्ज 15 कोटी 16 लाख रुपये इतकी रक्कम जमा करण्यासाठी अंबानी यांना 6 आठवड्यांची मुदत देत म्हटले की, अंबानी यांच्या बचावासाठी पुढे करण्यात आलेल्या बाबींना मान्य करता येणार नाही की त्यांचे नटवर्थ जवळपास शून्य आहे किंवा त्यांचे कुटुंब आर्थिक बाबतीत त्यांना मदत करणार नाही.

Anil Ambani | (Photo credit: archived, edited, symbolic images)

रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी (Reliance Group Chairman Anil Ambani) यांना इंग्लडच्या एका न्यायालयाने शुक्रवारी (7 फेब्रुवारी 2020) सांगितले की, 10 कोटी डॉलर्स इतकी रक्कम म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये 7 अब्ज 15 कोटी 16 लाख 6 आठवड्याच्या आत जमा करावेत. चीनची शीर्ष बँकेच्या अर्जावर सुनावणी करत असताना बँकेने हे निर्देश दिले. या निर्देशांमध्ये अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्याकडून 68 कोटी डॉलर (48 अब्ज 63 कोटी 88 लाख रुपये) वसूल करण्याबाबत सांगितले आहे. इंडस्ट्रियल अॅण्ड कमर्शियल बँक ऑफ चायना लिमिटेड मुंबई शाखेने आफल्यावतीने चायना डेवलपमेंट बँक आणि एक्जिम बँक ऑफ चायना ने अंबानी यांच्या विरोधात सरासरी पातळीवर पैसे जमा करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी केली होती.

याचिकाकर्त्या बँकांचे म्हणने आहे की, अंबानी यांनी फेब्रुवारी 2012 मध्ये जुने कर्ज फेडण्यासाठी सुमारे 65 अब्ज 83 कोटी 78 हजार रुपये म्हणजे 92.5 कोटी डॉलर इतके कर्जासाठी कथीत रुपात व्यक्तिगत गॅरेंटीचे पालन केले नाही. अंबानी (वय-60) यांनी अशा पद्धतीने कोणतेही गँरेंटीचा अधिकार देण्याबाबतच्या वक्तव्याचे खंडण केले. कर्ज करारानुसार हे प्रकरण इंग्लंडच्या कोर्टासमोर ठेवण्यात आले आहे. न्यायाधीश डेव्हिड वाक्समैन यांनी 7 अब्ज 15 कोटी 16 लाख रुपये इतकी रक्कम जमा करण्यासाठी अंबानी यांना 6 आठवड्यांची मुदत देत म्हटले की, अंबानी यांच्या बचावासाठी पुढे करण्यात आलेल्या बाबींना मान्य करता येणार नाही की त्यांचे नटवर्थ जवळपास शून्य आहे किंवा त्यांचे कुटुंब आर्थिक बाबतीत त्यांना मदत करणार नाही.

दरम्यान, रिलायन्स ग्रुपने न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध आपील करण्याचे संकेत दिले आहेत. अंबानी यांच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, 'अंबानी इंग्लंडच्या न्यायालयाच्या निर्णयाचे अवलोकन करत आहेत. आपील करण्याबाबत कायदेशीर सल्ला घेतला जाईल.' इंग्लंड आणि वेल्स उच्च न्यायालयाच्या वाणिज्यिक विभागामध्ये चीनच्या तीन बँकांना रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रमुखांविरुद्ध गेल्या वग्षी देण्यात आलेल्या सशर्त आदेशांच्या अटी निश्चित करण्यासंबंधात सुनावणीदरम्यान, अंबानी यांच्या वकिलांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला की, जर त्यांच्या कर्जाची अथवा देण्यांची एकत्रीत बेरीज केली तर अनिल अंबानी यांचे नेटवर्थ शून्य होईल. (हेही वाचा, उद्योगपती अनिल अंबानी यांच्याविरोधात लंडनच्या कोर्टात खटला दाखल)

अंबानी यांच्या वकिलांनी सुनावणीदरम्यान सांगितले की, 'अंबानी यांची नेटवर्थ 2012 पासून सातत्याने घसरत आहे. भारत सरकारची स्पेक्ट्रम देण्याच्या नितीमध्ये केलेल्या बदलांमुळे भआरतीय दूरसंचार क्षेत्रामध्येही नाट्यमयरित्या बदल आला आहे'. अंबानी यांचे वकील रॉबर्ट होवे यांनी म्हटले की, '2012 मधझ्ये अंबानी यांची गुंतवणूक सुमारे 7 अब्ज डॉलरपेक्षा अधिक होती. आज ही 6 अब्ज 36 कोटी 49 लाख 24 हजार कोटी रुपये (8.9 कोटी डॉलर) इतकीच राहीली आ हे. जर त्यांच्या देण्यांची एकूण बेरीज केली तर ती शून्यावर येते.' दरम्यान, बँकांच्या वकिलांनी अंबानी यांच्या वकिलांचा दावा खोडून काढत त्यांच्या ऐशोआरामी जीवनशैलीचा उल्लेख केला. बँकांच्या वकिलांनी म्हटले की, अंबानी यांच्याजवळ 11 किंवा त्याहीपेक्षा अधिक लग्जरी कार्स आहेत. एक खासगी विमान आहे. एक याट आणि दक्षिण मुंबई येथे एक विशिष्ट सीविमंड पेंटहाऊस आहे.

न्यायाधीश डेव्हिड वाक्समँन यांनी प्रश्न उपस्थीत केला की, 'अंबानी या मुद्द्यावर जोर देत आहेत की, ते व्यक्तिगत पातळीवर दिवाळखोर झाले आहेत. त्यांनी भारतामध्ये आपण दिवाळोखर झाल्याचे निवेदन दिले आहे?' अंबानी यांच्या वकिलांच्या पथकात सहभागी असलेले देशाचे मुख्य महाधिवक्ता हरीश साळवे यांनी याचे उत्तर 'नाही' असे दिले. त्यानंतर न्यायालयात भारताच्या आयबीसीचा थोडक्यात उल्लेख झाला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif