Lakhimpur Kheri Violence: केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र आशीष यास अटक, लखीमपूर हिंसाचार प्रकरण
आशीष मिश्रा हा केंद्रीय गृहराज्यमंत्री अज मिश्रा यांचा मुलगा आहे. जवळपास 12 तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी आशीष याला ताब्यात घेतले आहे.
उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) येथील लखीमपूर खीरी हिंसाचार (Lakhimpur Kheri Violence) प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या आशीष मिश्रा (Ajay Mishra) याला पोलिसांनी अटक केली आहे. आशीष मिश्रा हा केंद्रीय गृहराज्यमंत्री अज मिश्रा यांचा मुलगा आहे. जवळपास 12 तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी आशीष याला ताब्यात घेतले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी म्हटले आहे की, आरोपी आशीष मिश्रा हे चौकशीत सहकार्य करत नाहीत. आशीष मिश्रा याच्या अटकेनंतर लखीमपूर खीरी प्रकरणातील समितीचे अध्यक्ष डीजीआय उपेंद्र अग्रवाल यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना म्हटले की, प्रदीर्घ चौकशीनंतर आम्हाला आढळून आले की, आशीष मिश्रा हे योग्य सहकार्य करत नाहीत. ते विस्तृतपणे काहीच सांगत नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाईल.
सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यामांनी दिलेल्या वृत्तात प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, दुपारी 2.45 ते 3.30 वाजेपर्यंत आशीष मिश्रा कुठे होते. याबाबत ते माहिती देऊ शकले नाहीत. नेक प्रत्यक्षदर्शींनी त्यांनी शेतकऱ्यांना धडक दिलेल्या एसयूव्हीमधून प्रवास केल्याचे म्हटले आहे. आशीष मिश्री यांचे दोन सहकारी सुमित जयस्वाल आणि अंकित दास यांचीही चौकशी केली जाईल. (हेही वाचा, Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणी दोघांना अटक, केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला समन्स)
आशीष मिश्रा यांच्या विरोधात तिकुनिया पोलीस स्टेशनमध्ये 304 (अ), 302, 120 (ब), 338, 279, 147,148,149 अंतर्गत गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे. कलम 160 अन्वये आशीष मिश्रा यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. एसआयटीने जवळपास दोन तास चौकशी केली. लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणाशी संबंधीत इतर दोन लोकांना या आधी अटक झाली आहे. तीन ऑक्टोबररोजी लखीमपूर हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला होता.
ट्विट
शेतकऱ्यांना चिरडणे आणि त्यांची हत्या करण्याच्या आरोपाखाली केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष याला शनिवारी लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणी प्रदीर्घ चौकशी नंतर ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान केंद्रीय मंत्र्यांनी मात्र आपला मुलगा निर्दोश आहे. शेतकऱ्यांना धडक दिलेली येसयूव्ही माझ्या मुलाची आहे. पण त्यात तो नव्हता.