Namibian Cheetahs: आठ नामिबियन चित्तांपैकी एक चित्ता पुन्हा एकदा KNP मधून बाहेर पडला
त्याचे मुख्य क्षेत्र 748 चौरस किलोमीटर आहे, आणि त्याच्या आजूबाजूचा 487 चौरस किलोमीटर परिसर रविवारपासून बफर झोन आहे. जो शेजारच्या शिवपुरी वन विभागात आहे.
चित्ता पुनर्प्रत्यार्पन योजनेंतर्गत (Cheetah-Reintroduction plan) भारतात आणलेल्या एकूण आठ नामिबियन चित्त्यांपैकी एक नर चित्ता ( Male Cheetah) पुन्हा एकदा मध्य प्रदेशातील शिवपुरी येथील कुनो नॅशनल पार्कमधून (Kuno National Park) बाहेर पडला, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. ओबान (Oban) असे या चित्त्याचे नाव आहे. उल्लेखनीय म्हणजे या चित्ताने सुविधेतून बाहेर पडण्याची ही दुसरी वेळ आहे.या आधी बाहेर पडल्यानंतर त्याला मध्यप्रदेशातील कुनो नॅशनल पार्कजवळच्या गावातून तो परत आणण्यात आले होते.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच वर्षांचा ओबान KNPच्या हद्दीबाहेर गेला आहे. त्याचे मुख्य क्षेत्र 748 चौरस किलोमीटर आहे, आणि त्याच्या आजूबाजूचा 487 चौरस किलोमीटर परिसर रविवारपासून बफर झोन आहे. जो शेजारच्या शिवपुरी वन विभागात आहे.
अधिकाऱ्यांनी माहिती देताना पुढे म्हटले की, चित्ता केएनपीबाहेर गेला असला तरी, त्याचा मानवांना धोका नाही किंवा मानवाला धोका नाही. त्यामुळे ते परत आणण्यासाठी अधिकचे काही करण्याची गरज नाही. त्याच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली जात आहे. ओबान सुरक्षीत असल्याचेही अधिकारी म्हणाले. 17 सप्टेंबर रोजी नामिबियातून आणलेल्या आठ चित्त्यांपैकी एक ओबान, 2 एप्रिल रोजी केएनपीमधून भरकटला होता आणि 6 एप्रिल रोजी शिवपुरीतील बैराड येथून त्याची सुटका करण्यात आली होती. (हेही वाचा, Kuno National Park मधून बाहेर पडून जवळच्या गावात पोहोचला चित्ता; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण, पहा व्हिडिओ)
नामिबियातील चित्ता ही दक्षिण आफ्रिकेतील नामिबिया या देशात आढळणारी चित्ताची उपप्रजाती आहे. याला नैऋत्य आफ्रिकन चित्ता असेही म्हणतात. नामिबियन चित्ता ही चित्ताच्या दुर्मिळ उपप्रजातींपैकी एक आहे. चित्त्याच्या या प्रजातीची जंगलातील संख्या अंदाजे 3,500 इतकी असल्याचे सांगितले जात आहे.
ट्विट
नामिबियाच्या वाळवंटी वातावरणाशी नामिबियाचा चित्ता उत्तम प्रकारे जुळवून घेतो. जिथले तापमान दिवसा ४५°C (११३°F) पर्यंत पोगोटचेय आणि रात्री गोठवणाऱ्या थंडीइतके खाली येते. चित्त्याचे पाय लांब असतात, ज्यामुळे ते वेगाने धावू शकतात. एकूणच काय तर, नामिबियन चित्ता ही एक आकर्षक आणि महत्त्वाची प्रजाती आहे. जी अनेक आव्हानांना तोंड देत आहे. या सुंदर प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि भविष्यातील पिढ्यांना आनंद देण्यासाठी त्यांचे अस्तित्व सुनिश्चित करण्यासाठी कार्य करत राहणे महत्त्वाचे आहे.