Kuno National Park Cheetah Dies: दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या एका नर चित्त्याचा मृत्यू

आता त्यामध्ये 18 चित्ते उरले आहेत. दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या आठ चित्त्यांना गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले होतं.

Cheetah Died (PC - Twitter| @ians_india)

मध्य प्रदेश (Madhya Pradesh) मधील कुनो नॅशनल पार्कमध्ये (Kuno National Park) दक्षिण आफ्रिकेमधून आणलेल्या अजून एका चित्याचा (Cheetah) मृत्यू झाला आहे. रविवार, 23 एप्रिल दिवशी संध्याकाळच्या सुमारास हा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आहे. मागील 2 महिन्यातील ही दुसरी घटना आहे. या चित्याचं नाव उदय (Uday) आहे. 'उदय' 6 वर्षांचा होता.

काही दिवसांपूर्वीच कुनो मध्ये मादी चित्ता साशा हीचा मृत्यू झाला आहे. तिचा मृत्यू किडनी इंफेक्शन मुळे झाला होता.  उदय रविवारी मान खाली घालून जमिनीवर पडलेला वनअधिकार्‍यांना दिसला. त्यानंतर तो लंगडताना दिसला. यानंतर संबंधित डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. तेव्हा तो आजारी असल्याचं त्यांना समजलं. उदय वर उपचार सुरू करण्यात आले पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान 'उदय' च्या मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालानंतर समजणार आहे.

पहा ट्वीट

दक्षिण आफ्रिकेतून भारता मध्ये 20 चित्ते आणले होते. आता त्यामध्ये 18 चित्ते उरले आहेत. दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या आठ चित्त्यांना गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले होतं. फेब्रुवारीत दक्षिण आफ्रिकेहून 12 चित्ते आणण्यात आले. यामध्ये 7 नर आणि 5 मादी चित्त्यांचा समावेश आहे. त्यांनादेखील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले आहे. मात्र, यातील दोन चित्त्यांचा आता मृत्यू झाला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif