मुंबई: India-Pak Bordercha Raja प्रतिष्ठापणेसाठी जम्मू-कश्मीरकडे रवाना
मंदिरातील गणपती मूर्ती 6.5 फूट इतक्या उंचीची असते. या गणपतीला भारत पाकिस्तान बार्डरचा राजा (India-Pak Border cha Raja) म्हणून ओळखले जाते. दूसऱ्या दोन मूर्त्या मात्र एक-एक फुटाच्या असतात.
GANESHOTSAV 2019: गणपती बाप्पांच्या तीन मूर्ती मुंबई शहरातून जम्मूकडे रवाना झाल्या. जम्मू येथील एक महिला या गणेशमूर्ती जम्मूकडे घेऊन जाते. किरणबाला ईशर (Kiran Isher) असे या महिलेचे नाव आहे. तीनपैकी एक मूर्ती असते पुंछ येथील गणपती मंदिरासाठी तर, दुसऱ्या दोन मूर्ती मराठा रेजिमेंटसाठी असतात. मंदिरातील गणपती मूर्ती 6.5 फूट इतक्या उंचीची असते. या गणपतीला भारत पाकिस्तान बार्डरचा राजा (India-Pak Border cha Raja) म्हणून ओळखले जाते. दूसऱ्या दोन मूर्त्या मात्र एक-एक फुटाच्या असतात.
किरणबाला ईशेर ही महिला गेल्या चार वर्षांपासून या मूर्ती जम्मू येथे घेऊन जात आहे. सालाबादप्रमाणे तिने यंदाही या मूर्त्या नेल्या. सहा फुटाची भव्य मूर्ती घेऊन जाण्यासाठी खास लगेज व्हॅनची व्यवस्था करण्यात येते. यंदाही ही मूर्ती या खास व्हॅननेच जम्मूकडे प्रवास करत आहे.
दरम्यान, मधल्या काळात केंद्र सरकारने जम्मू काश्मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 हे कलम हटवले. त्यावेळी किरणबाला शहरातच होत्या. काश्मीरमध्ये हलम हटविल्याच्या पार्श्वभूमिवर बरेच प्रतिबंध लावण्यात आले होते. मात्र, आता ते काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमिवर बोलताना किरणबाला यांनी म्हटले आहे की, पुंछ स्थित शिव दूर्गा भैरव मंदिर ट्रस्ट समिती सदस्य या मूर्तींचे स्वागतच करेन. (हेही वाचा, Ganesh Chaturthi 2019: का साजरी केली जाते गणेश चतुर्थी, जाणून घ्या गणपती बाप्पाच्या जन्माची कहाणी)
एएनआय ट्विट
किरणबाला ईशर या सैनिक आणि शहिदासाठी प्रोग्रेसिव नेशन नावाची एक एनजीओ चालवतात. वांद्रे टर्मिनस येथून त्या स्वराज एक्सप्रेसने सकाळी 7.55 वाजता मूर्ती घेऊन काश्मीरकडे रवाना झाल्या. ईशर या मूर्ती घेऊन मंगळवारी संध्याकाळपर्यंत जम्मू येथे पोहोचतील. तर, आणि बुधवारी एका ट्रकच्या माध्यमातून या मूर्ती पुंच येथे नेल्या जातील. दरम्यान, या मूर्तींच्या माध्यमातून सामाजिक एकतेचा संदेश जाईल असा विश्वास ईशर यांना वाटतो.