केरळ: पहिली ट्रान्सजेंडर महिला पत्रकार Heidi Saadiya अडकली विवाहबंधनात; विशेष कायद्याअंतर्गत होणारे राज्यातील चौथे लग्न (Photo)
आज केरळमधील (Kerala) एर्नाकुलम येथे अथर्व मोहनशी हैदी सादियाने लग्न केले. केरळमधील विशेष विवाह कायद्यांतर्गत लग्न केलेले हैदी ही चौथी ट्रान्सजेंडर महिला आहे
सुप्रीम कोर्टाने ट्रान्सजेंडर (Transgender) लोकांना एका वेगळी ओळख निर्माण करून देऊन, एक मोठा ऐतिहासिक निर्णय दिला होता. आता पहिली ट्रान्स महिला पत्रकार हैदी सादिया (Heidi Saadiya) आज विवाहबंधनात अडकली. आज केरळमधील (Kerala) एर्नाकुलम येथे अथर्व मोहनशी हैदी सादियाने लग्न केले. केरळमधील विशेष विवाह कायद्यांतर्गत लग्न केलेले हैदी ही चौथी ट्रान्सजेंडर महिला आहे.
सादियाच्या लग्नाला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. एर्नाकुलममध्ये हा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. हैदी सादिया ही केरळमधील पहिली ट्रान्सजेंडर पत्रकार आहे, तिने कैराली न्यूज टीव्हीद्वारे आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.
सादियाने 31 ऑगस्ट 2019 रोजी पत्रकार म्हणून औपचारिक पदार्पण केले. जॉबमध्ये पहिल्यांदा तिच्यावर चंद्रयान-2 चा प्रवास कव्हर करण्याचे काम देण्यात आले होते. तिची ही पहिली असाइनमेंट तिने यशस्वीरीत्या पूर्ण केली होती. त्यावेळी सादिया म्हणाली होती, 'मला फार आनंद होत आहे की, आता लोक एलजीबीटी समुदायाच्या लोकांनाही त्यांच्या ऑफिसमध्ये जागा देत आहेत.' सादिया, त्रिवेंद्रम इन्स्टिट्यूट ऑफ जर्नलिझममधून इलेक्ट्रॉनिक मिडियामधून पोस्ट ग्रज्युएशन पूर्ण केल्यावर, एका टीव्हीमध्ये इंटर्न म्हणून रुजू झाली. एका आठवड्यानंतर चॅनेलने तिचे काम पाहून तिला वरची पोस्ट देऊ केली. (हेही वाचा: तृतीयपंथीयांसाठी मुंबईत बांधण्यात येणार स्वतंत्र स्वच्छतागृहे; ही योजना लवकरच अंमलात आणण्याचा पालिकेचा विचार)
पालकांनी स्वीकारण्यास नकार दिल्याने, वयाच्या 18 व्या वर्षी सादियाने आपले घर सोडले. त्यानंतर एका ट्रान्सजेंडर व्यक्तीने तिचा सांभाळ केला. तर अथर्व हा सूर्य आणि ईशान या ट्रान्सजेंडर जोडीचा दत्तक मुलगा आहे. दरम्यान, मागच्या वर्षी पश्चिम बंगालमध्ये मतदान ओळखपत्र मिळवणारी, ट्रान्ससेक्सुअल महिला तीस्तादेखील आपल्या बॉयफ्रेंडसोबत लग्नबंधनात अडकली.