IPL Auction 2025 Live

Karnataka Assembly Election Result 2023: कर्नाटकमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी, भाजप पराभवाच्या छायेत, निकालाबद्दल जाणून घ्या महत्त्वाच्या घडामोडी

आतापर्यंत पुढे आलेल्या कलानुसार काँग्रेसला (Congress) कर्नाटकमध्ये चांगला सूर गवसताना दिसत आहे. काँग्रेस स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करत असल्याचे चित्र आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजप पराभवाच्या छायेत आहे.

Congress Flag (Photo Credit- PTI)

कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 (Karnataka Assembly Election 2023) चा निकाल आता अधिक स्पष्ट होऊ लागा आहे. आतापर्यंत पुढे आलेल्या कलानुसार काँग्रेसला (Congress) कर्नाटकमध्ये चांगला सूर गवसताना दिसत आहे. काँग्रेस स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करत असल्याचे चित्र आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजप पराभवाच्या छायेत आहे. काँग्रेस आणि भाजपच्या सत्तासंर्षात एच डी कुमारस्वामी (HD Kumaraswamy) यांचा जेडी (एस) (JD(S) मात्र किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्नाटक काँग्रेस सध्या जल्लोष करताना पाहायला मिळत आहे.

काँग्रेस उमेदवारांना बंगळुरुला दाखल होण्याचे आदेश

काँग्रेस पक्षाने निवडणूक मतमोजणीदरम्यान बहुमताच्या आकड्यापेक्षाही अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे सत्तेचे स्वप्न साकार होण्याची चिन्हे दृष्टीक्षेपात दिसू लागताच पक्षाने आपल्या उमेदवारांना म्हणजेच संभाव्य आमदारांना बंगळुरुला बोलावले आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेस नेते सिद्धरमय्या यांनी म्हटले आहे की, काँग्रेस या निवडणुकीत 130 चा टप्पा सहज पार करेल. पत्राने आपले विद्यमान उमेदवार आणि संभाव्य आमदार एक राहण्यासाठी रिसॉर्ट बुक केल्याचे समजते. (हेही वाचा, Priyanka Gandhi Prays: काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची Karnataka Results दिवशी मंदिरात प्रार्थना (Watch Video))

मुख्यमंत्री बसवराज एस बोम्मई यांना भाजपच्या विजयाची खात्री

आतापर्यंत हाती आलेला मतमोजणीचा कल पाहता काँग्रेस कर्नाटकमध्ये स्वच्छ बहुमत मिळविण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. असे असले तरी कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना मात्र भाजपच्या विजयाची खात्री आहे. ही खात्री ते कशाच्या जोरावर व्यक्त करत आहेत हे समजू शकले नाही.

आम्ही छोटा पक्ष आम्हाला फक्त विकासाची आशा- एचडी कुमारस्वामी

कर्नाटकमध्ये काँग्रेस मुसंडी मारण्याच्या आणि भाजप क्रमांक दोनचा पक्ष ठरण्याच्या स्थितीत असताना एचडी कुमारस्वामी यांचा जेडीएस किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष एचडी कुमारस्वामी यांच्या संपर्कात असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिल्यानंतर 'आपण एक छोटा पक्ष आहोत. आपली स्वत:साठी कोणतीही मागणी नाही. आम्हाला फक्त चांगल्या विकासाची आशा आहे,' असे एचडी कुमारस्वामी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणूक 2018 मध्ये भाजपने 104 जागा जिंकल्या होत्या, काँग्रेसने 80 आणि जेडीएसने 37 जागा जिंकल्या होत्या. भाजपच्या बीएस येडियुरप्पा यांनी सरकार स्थापन केले परंतु बहुमत चाचणीपूर्वी राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसने मिळून सरकार स्थापन केले.