Karnataka Election Result 2023: कर्नाटकमध्ये सीमा भागात काँग्रेसची हवा, दोन ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीचा बुलंद आवाज
आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार या भागात काँग्रेसची हवा आहे. मात्र, दोन ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समिती चांगली कमगिरी करताना दिसत आहे. या दोन्ही ठिकाणी महाराष्ट्र एकिकरण समितीचे उमेदवार काँग्रेस आणि भाजपला जोरदार टक्कर देताना पाहायला मिळत आहेत.
Karnataka Assembly Election Result 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपच्य सत्तासिंहासनाला हादरे बसू लागले आहेत. भाजपचे हे सत्तासिंहासन काँग्रेस उलटणार का? या प्रश्नाचे उत्तर अवख्या काही तासांतच मिळणार आहे. सद्यास्थितीत तर काँग्रेसचे पारडे जड ठरताना दिसत आहे. दरम्यान, कर्नाटक निवडणुकीत अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सीमा भागा काय होते याबाबत उत्सुकता होती. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार या भागात काँग्रेसची हवा आहे. मात्र, दोन ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समिती चांगली कमगिरी करताना दिसत आहे. या दोन्ही ठिकाणी महाराष्ट्र एकिकरण समितीचे उमेदवार काँग्रेस आणि भाजपला जोरदार टक्कर देताना पाहायला मिळत आहेत.
बेळगावबद्दल बोलायचे तर बेळगावमध्ये एकूण तिन मतदारसंघ आहेत. बेळगाव दक्षिण, बेळगाव उत्तर आणि बेळगाव ग्रामीण. या ठिकाणी भाजप आणि काँग्रेस यांच्यात दुरंगी सामना होतो आहे. कारण या तिन्ही जागांवर कुमारस्वामी यांच्या जेडीएसने एकही उमेदवार उबा केला नाही. या ठिकाणी काँग्रेस उमेदवार आघाडी घेताना दिसत आहेत. (हेही वाचा, Karnataka Assembly Election Result 2023: कर्नाटकमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी, भाजप पराभवाच्या छायेत, निकालाबद्दल जाणून घ्या महत्त्वाच्या घडामोडी)
सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीचे 4 उमेदवार
खानापूर: मुरलीधर पाटील (महाराष्ट्र एकीकरण समिती)
बेळगाव दक्षिण: रमाकांत कोंडूसकर (महाराष्ट्र एकीकरण समिती
बेळगाव उत्तर : अमर येळ्ळूरकर (महाराष्ट्र एकीकरण समिती)
बेळगाव ग्रामीण : आर. एम. चौगुले (महाराष्ट्र एकीकरण समिती)
बेळगाव उत्तर मतदारसंघात काँग्रेसचे आसिफ सैत आणि भाजपचे रवी पाटील यांच्यात लढत होत आहे. दुसऱ्या बाजूला बेळगाव दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे प्रभावती मस्तमर्डी आणि भाजपचे अभय पाटील यांच्यात लढत आहे. बेळगाव ग्रामिणमध्ये काँग्रेसचे लक्ष्मी रवींद्र हेब्बाळकर विरुद्ध नागेश मान्नोलकर यांच्यात लढत होत आहे.