Karnataka Assembly Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणूक आज जाहीर होण्याची शक्यता; निवडणूक आयोगाची 11.30 वाजता पत्रकार परिषद

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने तर उमेदवारांची पहिली यादी जाहीरही केली आहे. त्यामुळे कर्नाटकातील जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकांची मोर्चेबांधणी पाठिमागील अनेक महिन्यांपासून केली आहे.

Election Commission of India | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

कर्नाटक विधानसभा निडवणूक 2023 (Karnataka Assembly Election 2023) साठी आज घोषणा होण्याची शक्यता आहे. भारतीय निवडणूक आयोगा (Election Commission of India) द्वारे सकाळी 11.30 वाजता घेतल्या जाणाऱ्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली जाऊ शकते. केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे निवडणुकीची औपचारीक घोषणा केली जाणार असली तरी, राज्यात निवडणुकांचे बिगूल या आधीच फुंकले गेले आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने तर उमेदवारांची पहिली यादी जाहीरही केली आहे. त्यामुळे कर्नाटकातील जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकांची मोर्चेबांधणी पाठिमागील अनेक महिन्यांपासून केली आहे.

कर्नाटक विधानसाठी एकूण 224 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या आधी या राज्यात विधानसभेसाठी शेवटची निवडणूनक 2018 मध्ये झाली होती. विधानसभा निवडणूक 2018 मध्ये भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक 104 जागा जिंकल्या होत्या. तर त्या खालोखाल काँग्रेस पक्षाने 80, जदयूने 37 जागा जिंकल्या होत्या. मतदारांनी या निवडणुकीत (2018) कोणालाच स्पष्ट बहुमत दिले नव्हते. त्यामुळे सुरुवातीचे काही काळ काँग्रेस आणि जदयूने एकत्र सरकार स्थापन केले. मात्र, भाजपने या सरकारला धक्का देत नवी राजकीय समिकरणे जुळवली आणि सत्ता मिळवली. (हेही वाचा, Karnataka Assembly Elections 2023: काँग्रेस पक्षाकडून कर्नाटक विधानसभेसाठी 124 उमेदवारांची पहिली यादी जाहीर)

आगामी निवडणुकीसाठी, काँग्रेसने 25 मार्च रोजी 124 उमेदवारांची नावे जाहीर केली. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे वरुणामधून तर कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार कनकापुरा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

ट्विट

दुसऱ्या बाजूला सत्ताधारी भाजपने कर्नाटकमध्ये वेगळी खेळी केली आहे. कर्नाटक सरकारने (भाजप) मुस्लिमांसाठी असलेले 4% आरक्षण काढून ते लिंगायत आणि वोक्कलिग या समहाला दिले आहे. त्यामुळेही कर्नाटकमध्ये हिंदू-मुस्लिम असा वाद होण्याची शक्यता आहे. दरम्यान, एका सभेला संभोदित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की कर्नाटक सरकारने मुस्लिमांसाठी 4 टक्के ओबीसी आरक्षण रद्द केले आणि ते लिंगायत आणि वोक्कलिगा या दोन प्रबळ समुदायांमध्ये वितरित केले. अल्पसंख्याक मुस्लिमांना आरक्षण देणार्‍या ध्रुवीकरणाच्या राजकारणाबद्दल शहा यांनी पूर्वीच्या काँग्रेस सरकारवर टीका केली. त्यामुळे या वेळच्या निवडणुकीत कर्नाटकची जनता कोणाच्या पारड्यात वजन टाकते याबाबत उत्सुकता आहे.