कर्नाटक येथे तब्बल 1.25 लाखांची अवैध दारु बाळगल्याप्रकणी दोन जणांना अटक
तसेच दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत जवजवळ 1.25 लाख रुपयांच्या घरात आहे.
देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून विविध ठिकाणी लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवासुविधा सुरु ठेवण्यात आल्या आहेत. मात्र तळीरामांची या काळात गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वीच युपी येथे लॉकडाउनच्या काळात दारुचे दुकान सुरु राहणार असल्याची अफवा पसरताच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. याच पार्श्वभुमीवर आता कर्नाटक येथे अवैध प्रकारने दारु बाळगल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत जवजवळ 1.25 लाख रुपयांच्या घरात आहे.
कर्नाटकचे सहआयुक्त संदिप पाटील यांनी असे म्हटले आहे की, गुन्हे शाखेकडून गुरुवारी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी अवैध प्रकारे दारु बाळगली असून त्याची किंमत 1.25 लाख रुपयांच्या घरात आहे. तर दोन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात गुन्हा seized liquor bottles दाखल करण्यात आल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.(Coronavirus: इंदोर येथे तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांवर स्थानिक नागरिकांकडून दगडफेक; पाहा व्हिडिओ)
दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागल्याने संपूर्ण देशात संचार बंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना घरातच राहण्याशिवाय पर्याय नाही. कोरोना विषाणूसंदर्भात प्रत्येकाच्या मनात भितीनिर्माण झाली असून दारू आणि तंबाखूचे सेवन कराणाऱ्यांना याचा अधिक धोका आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दारु आणि तंबाखूचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती होते.