Karnataka: विकृतीचा कळस! 24 वर्षीय तरुणाचा गायीच्या वासरावर बलात्कार; कृत्य करताना रंगेहात पकडले, गुन्हा दाखल

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्याला ताब्यात घेतले.

Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कर्नाटकातील (Karnataka) रायचूर (Raichur) जिल्ह्यातून एका वासरावर बलात्कार (Rape) झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपी इम्तियाज हुसेन मियाँ याला हे कृत्य करताना रंगेहात पकडण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे मशिदीलगतच्या एका शेतात ही घटना घडली आहे. या प्रकरणी 24 वर्षीय मियाँला पोलिसांनी सोमवारी (2 जानेवारी 2023) पकडले. पोलिसांच्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमरेश बसण्णा याने या वासराला इतर गायींसह शेतात चरण्यासाठी सोडले होते. त्या जवळच एक मशीद आहे. त्याचवेळी आरोपीने वासराला झाडाला बांधून त्याच्यावर बलात्कार केला. इम्तियाज हुसेनला हे गैरकृत्य करताना आजूबाजूच्या लोकांनी पाहिल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्याला ताब्यात घेतले.

घटनेची माहिती मिळताच वासराच्या मालकाने हुसेनविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने प्राथमिक तपासातच गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान, अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. ऑगस्ट 2022 मध्ये उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये गायीसोबत घृणास्पद कृत्य केल्याची घटना समोर आली होती. शोएब या ई-रिक्षा चालकाला गायीसोबत घाणेरडे काम करताना रंगेहात पकडण्यात आले. (हेही वाचा: Jalna: शेतकऱ्याने सरकारी दप्तरदिरंगाईला कंटाळून स्वत:ला जमिनीत गाडून घेतले)

दुसरीकडे, छत्तीसगडच्या रायपूरमध्ये जुलै 2022 मध्ये शहारे आलम याला चारही पाय बांधून गायीवर बलात्कार करताना पकडण्यात आले होते. त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो ते कृत्य करत होता. पकडल्यानंतर त्याने गायीसोबत गैरकृत्य केल्याची कबुली दिली होती. फेब्रुवारी 2022 मध्ये राजस्थानमधील भिवडी येथूनही अशीच एक घटना समोर आली होती.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif