Kanpur Stray Dog Attacks: कानपूरमध्ये मंदिरात जाणाऱ्या 11 वर्षीय मुलावर कुत्र्यांचा हल्ला, चिमुकला गंभीर जखमी

तो एकटा असल्याचं पाहून तेथील काही कुत्रे त्याच्यावर भुंकू लागले. कुत्र्यांना पाहून तो तेथून पळू लागला. पळताना पाहून 3 ते 4 कुत्रे त्याच्या मागे लागले आणि भुंकत त्याच्यावर हल्ला केला.

Dog (Representational Image; Photo Credit: Pixabay)

उत्तर प्रदेशच्या कानपुर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका लहान मुलावर रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांच्या एका टोळक्याने हल्ला केला आहे. या घटनेत चिमुकला गंभीर जखमी झाला आहे.  शुभम असं 11 वर्षीय मुलाचं नाव आहे. परिसरात असलेल्या एका मंदिरात तो दिवे लावण्यासाठी जात होता. तो एकटा असल्याचं पाहून तेथील काही कुत्रे त्याच्यावर भुंकू लागले. कुत्र्यांना पाहून तो तेथून पळू लागला. पळताना पाहून 3 ते 4 कुत्रे त्याच्या मागे लागले आणि भुंकत त्याच्यावर हल्ला केला.  (हेही वाचा - Liquor Mafia Kills Dog In Parel: अवैध दारू माफियांकडून कुत्र्याला बेदम मारहाण; मृत कुत्र्याला पाहून मालकिनीला अश्रू अनावर, (Watch Video))

कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात शुभमच्या हातांना बऱ्याच जखमा झाल्या आहेत. ही घटना घडली तेव्हा या मुलाजवळ तेथे कोणीच नव्हतं. जवळच असलेल्या काही व्यक्तींनी त्याचा आवाज ऐकला आणि ते त्याच्याजवळ पळत आले. नागरिकांनी कुत्र्यांना दगडं मारून तेथून पळून लावलं. जखमी अवस्थेत या मुलाला नागरिकांनी रुग्णालयात देखील दाखल. शुभमच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी देखील रुग्णालयात धाव घेतली.

या घटनेनंतर शुभमच्या आई वडिलांनी मंदिराच्या परिसरात राहणाऱ्या एक दाम्पत्य जे सर्व कुत्र्यांना खाऊ घालतात त्यांच्याशी वाद घातला. शेवटी अन्य नागरिकांनी मध्यस्ती करत हा वाद मिटवला. सध्या शुभमवर रुग्णालयात उपचार हे सुरु असून या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif