मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी कमलनाथ यांच्या नावाची घोषणा!
नवे मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न असताना कमलनाथ यांची मुख्यमंत्रीपदी निवड केल्याची घोषणा काँग्रेसने ट्विटरद्वारे केली.
पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांच्या निकालांनी सत्ता परिवर्तन झाल्यानंतर आता नवे मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मध्यप्रदेशात (Madhya Pradesh) भाजप (BJP) सरकारने सत्ता स्थापन करण्यास नकार दिला असल्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी सांगितले. तब्बल 15 वर्षे सत्तेत राहिल्यानंतर अखेर त्यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर नवे मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न असताना कमलनाथ (Kamal Nath) यांची मुख्यमंत्रीपदी निवड केल्याची घोषणा काँग्रेसने (Congress) ट्विटरद्वारे केली. शनिवारी यांचा शपथविधी सोहळा संपन्न होण्याची शक्यता आहे. मावळत्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा; हे आहेत तीन राज्यांच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार
काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून कमलनाथ यांना मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मध्य प्रदेशात उपमुख्यमंत्रीपद नसेल असेही एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोराम, छत्तीसगड, तेलंगणा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचं काय झालं?
मध्यप्रदेशात कमलनाथ आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते. मात्र कमलनाथ यांचे नाव सुरुवातीपासूनच आघाडीवर होते.