न्यायमूर्ती रंजन गोगोई कडून शरद बोबडे यांच्या नावाची भारताच्या 'सरन्यायाधीश' पदासाठी शिफारस
त्यानंतर सरन्यायाधीश पदाची माळ शरद बोबडे यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. शरद बोबडे हे 47 वे सरन्यायाधीश होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) सरन्यायाधीशपदी (Chief Justice of India) असलेल्या रंजन गोगोई (Ranjan Gogoi) यांच्या सेवा निवृत्तीनंतर आता शरद बोबडे (Justice SA Bobde) या मराठमोळ्या न्यायाधीशाची वर्णी लागण्याची शक्यता आहे. रंजन गोगोई यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली आहे. रंजन गोगाईंचा कार्यकाळ 17 नोव्हेंबरला संपणार आहे. शरद बोबडे हे 47 वे सरन्यायाधीश होणार आहे. नियमानुसार, निवृत्त होणारे सरन्यायाधीश पुढील सरन्यायाधीशाच्या नावाची शिफारस सरकारकडे पाठवू शकतात. तर सरन्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती भवनातून केली जाते.
ANI Tweet
कोण आहेत शरद बोबडे कोण आहेत?
- शरद बोबडे यांचा जन्म 24 एप्रिल 1956 रोजी नागपूरमध्ये झाला.
- नागपूर विश्वविद्यालयातून बोबडेंनी एलएलबीचं शिक्षण पूर्ण केलं.
- 1978 साली ते महाराष्ट्र बार काऊंन्सिलचे सदस्य बनले आणि 1998 साली वरिष्ठ अधिवक्ता म्हणून त्यांची नेमणूक झाली.
- 29 मार्च 2000 साली बोबडेंची निवड मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश पदावर झाली.
- 16 ऑक्टोबर 2012साली ते मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले.
शरद बोबडे यांची निवड सरन्यायाधीश म्हणून झाल्यास त्यांचा कार्यकाळ 18 नोव्हेंबर 2019 ते 23 एप्रिल 2021 असा असेल.