JioMart App आता गुगल प्ले स्टोअर, अॅप स्टोअर वर उपलब्ध; देशातील 200 पेक्षा अधिक शहरांमध्ये सेवा सुरु

रियान्सने अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांसारख्या ऑनलाईन रिटेल कंपन्यांना टक्कर देण्यासाठी जिओमॉर्ट लॉन्च केले आहे. काही महिन्यांपूर्वी रिलायन्सने जिओमॉर्ट ची घोषणा केली होती आणि त्यानंतर त्यांनी फेसबुक सोबत करार केल्याची मोठी बातमी समोर आली.

JioMart App आता गुगल प्ले स्टोअर, अॅप स्टोअर वर उपलब्ध; देशातील 200 पेक्षा अधिक शहरांमध्ये सेवा सुरु
JIoMart (Photo Credits: Twitter)

रिलायान्सने (Reliance) अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांसारख्या ऑनलाईन रिटेल कंपन्यांना टक्कर देण्यासाठी जिओमॉर्ट लॉन्च केले आहे. काही महिन्यांपूर्वी रिलायन्सने जिओमार्ट (JioMart) ची घोषणा केली होती आणि त्यानंतर त्यांनी फेसबुक सोबत 43,574 कोटींचा करार केल्याची मोठी बातमी समोर आली. काही महिन्यांच्या टेस्टिंगनंतर रिलायन्सने जिओमार्ट हा अॅप अॅनरॉईड (Android) आणि आयफोन (iphone) युजर्ससाठी (Users) रिलिज केला आहे. जिओमार्ट अॅप हा गुगल प्ले स्टोअर आणि अॅप्पल अॅप स्टोरवर उपलब्ध आहे.

आतापर्यंत जिओमार्टची वेबसाईट (jiomart.com) देशातील 200 पेक्षा अधिक शहरांमध्ये टेस्टिंगसाठी वापरली जात आहे. या वेबसाईटद्वारे ऑनलाईन वस्तू मागवता येतात. जिओमार्ट या मोबाईल अॅपमुळे युजर्संना वस्तू ऑर्डर करणे सोयिस्कर ठरेल. देशातील इतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मला टक्कर देण्यासाठी रिलायन्स जिओने जिओमार्ट अॅप लॉन्च केले आहे. (RIL AGM 2020: जिओ प्लॅटफॉर्म मध्ये आता Google ची देखील गुंतवणूक; 5G solution, JioGlass सह या मोठ्या घोषणा)

गेल्या आठवड्यात झालेल्या रियालन्सच्या Annual General Meet 2020 मध्ये मुकेश अंबानी यांनी जिओमार्टच्या भविष्यातील विकासाबद्दल घोषणा केली आणि पुढच्या काही महिन्यात कंपनीच्या ध्येयांबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर रिलायन्स जिओमार्ट आणि व्हॉट्सअॅप यांचे टायअप करुन देशातील छोट्या व्यापारांच्या वाढीसाठी प्रयत्न केले जातील, असे मुकेश अंबानी यांनी सांगितले.

तसंच जिओमार्टमध्ये सध्या दिवसाला 250,000 ऑर्डर्स येत असून याची संख्या दिवसागणित वाढत आहे. सध्या जिओमार्ट मध्ये किराणा सामान, धान्य, खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. लवकरच यामध्ये इलेक्ट्रोनिक्स, फॅशन, औषधे आणि हेल्थकेअर वस्तूंचाही समावेश करण्यात येईल. जिओमार्ट अॅपमधून पेमेंट करताना तुम्ही नेट बँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्ड, Sodexo, ROne loyalty points आणि कॅश ऑन डिलिव्हरी या ऑप्शनचा वापर करु शकता.

जिओमार्ट या अॅपमुळे किराणा स्टोअर मालकांना आपला व्यापार डिजिटली वाढवता येईल. यामुळे किराणा माल व्यापाऱ्यांना ग्राहकांसोबत व्यापार करणे अधिक सोयिस्कर होईल. किराणा माल व्यापारी आपल्या ग्राहकांसोबत जिओमार्ट अॅप द्वारे कनेक्ट होऊ शकतील आणि पैशांची देवाण घेवाणही करु शकतील.

(The above story first appeared on LatestLY on Jul 19, 2020 12:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).