Bangalore Crime: शरीर सुखाची मागणी पुर्ण न केल्याच्या सुडातून तरुणाकडून एक्स गर्लफ्रेन्डचा प्रायवेट व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर
सायको एक्स बॉयफ्रेन्ड तरुणीला कॉल करुन त्रास देवू लागला. तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करु लागला. दोघेही रिलेशनशीपमध्ये असताना तरुणाने काही लपून प्रायवेट व्हिडीओ काढले होते ते व्हिडीओ त्याने सुडबुध्दीतून सोशल मिडीयावर शेअर केले.
बंगळूरु शहरातून एक धक्कादयक प्रकार पुढे आला आहे. एका सायको तरुणाने केवळ सुडाच्या भावनेतून आपल्या एक्स गर्लफ्रेन्डचा प्रायवेट व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. तरी या प्रकरणी या तरुणास पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. २०१९ मध्ये समर प्रामाणिक नामक तरुण सोन्याच्या दुकानात काम करत होता. तरी त्याचं मार्केटमध्ये पार्लरमध्ये काम करणाऱ्या आरोपी समर बरोबर ओळख झाली. योगायोगाने हे दोघही एकाच राज्यातील रहिवाशी निघालेत. म्हणून या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. कालांतराने याच्यात संवाद वाढला आणि दोघांचेही प्रेम संबंध जुळलेत. दोघही काही काळ रिलेशनशीपमध्ये राहिलेत. पण कोरोना लॉकडाऊनमध्ये तरुणी तिच्या घरी परतली आणि तिकडेचं तिचं लग्न झालं. स्वतच्या घरी परतल्या नंतर तरुणी आणि आरोपी समरमध्ये कुठलेही संबंध नव्हते.
तरुणी आपलं सुखी आयुष्य तिच्या पतीबरोबर जगू लागली. पण काम शोधायचं म्हणून दामपत्याने स्वतचं राज्य पश्चिम बंगालमधून कर्नाटकाच्या बंगळूरु येथे येण्याचा निर्णय घेतला. तरुणी या शहरामध्ये राहिलेली असल्याने इकडे आपल्याला नक्की रोजगार मिळणार अशी अपेक्षा होती. त्यामुळे हे नवविवाहीत जोडपं बंगळूरुत आलं आणि वास्तव्यास राहू लागलं. पण ही बाब अक्स बॉयफ्रेण्ड समरच्या कानावर पडली आणि त्याने तरुणीबाबत विचारपूरस करत तिचा मोबाईल नंबर मिळवला. (हे ही वाचा:- Uttar Pradesh: माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे; आठवीच्या विद्यार्थिनीला शिक्षकाचे प्रेमपत्र, नंतर झाले निलंबन)
नंबर मिळाल्यानंतर सायको एक्स बॉयफ्रेन्ड तरुणीला कॉल करुन त्रास देवू लागला. तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करु लागला. पण आता माझं लग्न झालं आहे आणि आता मला तुझ्या बरोबर कुठलेही संबंध ठेवायचे नाही असं तरुणीने इसमास फटकावून सांगितले. तरुणीचे हे कटू शब्द ऐकून आरोपीस मनस्ताप झाला आणि हे दोघेही रिलेशनशीपमध्ये असताना तरुणाने काही लपून व्हिडीओ काढले होते ते व्हिडीओ त्याने सुडबुध्दीतून सोशल मिडीयावर शेअर केले. तरी संबंधीत तरुणीकडून या तरुणाविरुध्द तक्रार दाखल करण्यात आली असुन कर्नाटका पोलिसांनी या तरुणाच्या मुस्क्या आवळल्या आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Jan 09, 2023 11:12 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

