झारखंडमध्ये रघुवर दास यांच्या नेतृत्वात भाजपा (BJP) सरकारला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. यंदाची झारखंड विधानसभा निवडणुक हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वात झामुमो-कॉंग्रेस-आरजेडी आघाडीने जिंकली आहे. सध्याच्या निकालाप्रमाणे भाजपने 22 जागांवर विजय मिळवला आहे. कॉंग्रेसला 15 जागा, झामुमोला 29 जागा तर आरजेडीला 1 जागा मिळाली आहे. अशाप्रकारे या आघाडीने 45 जागांवर विजय प्राप्त करत बहुमत मिळवले आहे.
निवडणूक आयोगाच्या ट्रेंड्सनुसार झारखंडमध्ये कॉंग्रेस-झामुमो-राजद आघाडीने आतापर्यंत 39 जागा जिंकल्या आहेत आणि भारतीय जनता पक्षाने 18 जागा जिंकल्या. भाजप 7 जागांवर आघाडीवर आहे. कॉंग्रेस 4 जागांवर तर, झामुमो 4 जागांवर आघाडीवर आहे.
झारखंड विधानसभा निवडणुकीचा आतापर्यंतचा निकाल पाहता, झारखंडमध्ये भाजपच्या हातातून सत्ता गेल्यात जमा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी नव्या सरकारला शुभेच्छाही दिल्या आहेत. अशात झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आज संध्याकाळी राजभवनावर राज्यपाल द्रौपदी मुर्मू, यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्त केला.
झारखंडमध्ये भाजपला पराभवाचा धक्का बसला आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडमध्ये भाजप 12 जागा गमावताना दिसत आहेत. त्याचबरोबर, जेव्हीएम, कॉंग्रेस आणि आरजेडी यांच्या युतीचे सरकार स्थापन होणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे. झारखंडमधील पराभवानंतर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ट्वीट करत आपण जनतेच्या निर्णयाचे स्वागत करतो अशी प्रतिक्रिया दिली आहे.
अमित शाह म्हणाले, 'झारखंडच्या लोकांनी दिलेल्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. भाजपाला 5 वर्षे राज्यसेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो. यापुढेही भाजप सतत राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहील. तसेच सर्व कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन'
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या ट्रेंडमध्ये झामुमो आणि कॉंग्रेस आघाडीचे सरकार विजयी होणार आहे हे जवळजवळ निश्चित झाले आहे. यामुळे झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष हेमंत सोरेन हे नवीन मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता आहे. झारखंड निवडणुकीच्या निकालावर हेमंत सोरेन यांनी पत्रकार परिषद घेऊन मतदारांचे आभार मानले. यावेळी त्यांनी शिबू सोरेन, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल, प्रियंका गांधी, लालू प्रसाद यादव यांचेही आभार मानले. झारखंड धानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. बहुमतासाठी 41 जागांची आवश्यकता आहे. कॉंग्रेस-झामुमो युती 46 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप 25 जागांवर पुढे आहे.
झारखंड निकालात मतमोजणीच्या फेऱ्या अद्याप सुरु आहेत. अंतिम निर्णय अद्याप हाती आला नसला तरी भाजपच्या हातून सत्ता निसटत असल्याचे आता जवळपास निश्चित आहे. यावर पत्रकार परिषदेतून बोलत असताना विद्यमान मुख्यमंत्री रघुवर दास यांनी हा भाजपचा नसुन माझा प्रभाव आहे अशी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. तसेच जनतेचा निर्णय खुलेपणाने स्वीकारेन पण अजून निर्णयासाठी वाट पहा असेही त्यांनी माध्यमांना सांगितले.
झारखंड निवडणूक निकालात आघाडीवर असणाऱ्या JMM पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री पदाचे दावेदार हेमंत सोरेन यांनी रांची येथील आपल्या घराबाहेर सायकल चालवत आपल्या पक्षाच्या विजयाचे सेलिब्रेशन केले आहे. झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाने काँग्रेस व आरजेडी सोबत मिळून आतापर्यंत झारखंड मध्ये 47 जागांवर आघाडी कायम ठेवली आहे.
झारखंड विधानसभा निवडणुक निकालात आता JMM, काँग्रेस व आरजेडी स्पष्ट बाजी मारताना दिसत आहे. चार वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, महागठबंधन हे तब्बल 49 जागांवर आघाडीवर आहे तर भाजपची पिछेहाट होत असून तूर्तास केवळ 21 जागी आघाडी टिकवण्यात यश लाभल्याचे दिसत आहे.
हुसैनाबाद विधानसभा मदतारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष कमलेश कुमार सिंह आघाडीवर आहेत. हुसेनाबाद मदतारसंघातील उमेदवारांची आघाडी पुढीलप्रमाणे
झारखंड विधानसभा निवडणुकीत अजून मतमोजणी सुरु असून पूर्ण निर्णय हाती आलेला नाही मात्र दुपारी 1 वाजेपर्यंतचे कल पाहता झारखंड मुक्ती मोर्चाचे पक्ष बळकट असल्याचे स्पष्ट आहे. भाजपला मागील काही वेळापासून केवळ 29 जागांवर अडवून ठेवत JMM ने 40 जागांवर आघाडी घेतली आहे.
झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास हे निकालाचा कल पाहता जमशेदपूर पूर्व मतदारसंघातून काही वेळापुर्वी आघाडीवर होते, ज्यात मध्येच अडथळा येऊन त्यांना हजार मते पिछाडीवर टाकत विरोधी उमेदवार पुढे जात होते. आता कुठेतरी दास यांची आघाडी पुन्हा स्थिर होत आहे, मात्र अजूनही केवळ 156 मतांचा फरक असल्याने विजयाची स्पष्ट ग्वाही देता येत नाहीये.
झारखंड निकालाचे कल JMM कडे झुकत असतानाही मुख्यमंत्री रघुवर दास यांनी भाजपच सरकार स्थापन करेल असा ठोस दावा केला आहे. "सध्या कल समोर आला आहे अंतिम निर्णय नाही आणि जर का सरयू राय यांच्यामुळे काही तोटा झाला असता तर मला मतेच मिळाली नसती", असे म्हणत दास यांनी निकाल हाती येईपर्यंत धीर धरण्याचे आवाहन केले आहे. संध्याकाळी, निकालानंतर दास हे रांची येथे पत्रकार परिषद घेणार आहेत.
झारखंड विधानसभा निवडणूक निकालाचा प्राथमिक कल हाती येत असताना आता JMM मोठ्या फरकाने आघाडी घेत आहे, त्यामुळेच जेएमएमचे नेते हेमंत सोरेन यांची मुख्यमंत्री पदी नेमणूक होणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. सोरेन हे डुमका मतदारसंघातून अजूनही पिछाडीवर आहेत तर बऱ्हेट मध्ये त्यांनी मतांची आघाडी घेतली आहे.
झारखंड विधानसभा निवडणूक निकालात आता भाजपाची चिंता वाढताना दिसत आहे, सध्या झारखंड मुक्ती मोर्चा 45 जागी तर भाजप 25 जागी जिंकताना दिसून येत आहे, सोबतच AJSU 4 जागी आणि JVM 3जागी आघाडीवर आहे. हा फरक बराच मोठा असून आता जागांसाठी भाजप जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करत असल्याचा माध्यमांच्या सूत्रांचा अंदाज आहे.
झारखंड विधानसभा निवडणूक निकालात प्रादेशिक पक्ष झारखंड मुक्ती मोर्चाचा पगडा सुरुवातीपासून भारी असल्याचे समोर येत आहे. सध्याचा प्राथमिक कल पाहता JMM तब्बल 41 जागांवर पुढे असून भाजपचा आकडा बराच वेळ 30 वरच अडकून आहे. या 11 जागांचा फरक टिकून राहिल्यास झारखंड मध्ये महागठबंधन सरकार स्थापन होण्याची पूर्ण संधी आहे.
झारखंड विधानसभा निवडणूक निकालाचा प्राथमिक कल पाहता अद्याप कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत प्राप्त झाल्याचे दिसत नाहीये, तूर्तास भाजप आणि झारखंड मुक्ती मोर्चा मध्ये मात्र काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. तर AJSU आणि JVM अजूनही 4 जागांवर अडकून आहे.
झारखंड मुक्ती मोर्चाचे मोठे नेते हेमंत सोरेन यांची डुमका आणि बऱ्हेट या दोन्ही जागांवरील जिंकण्याची संधी कमी होताना दिसून येत आहे, प्राथमिक कल हाती येताच मताधिक्य असणारे सोरेन हे आता मतांच्या शर्यतीत दोन्ही मतदारसंघातून पिछाडीवर आहेत.
झारखंड विधानसभा निवडणूक निकालाचे प्राथमिक कल पाहता भाजप वर महागठबंधन भारी पडत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे हातची सत्ता टिकवून ठेवण्यासाठी भाजपने हालचाली सुरु केल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप कडून AJSU, JVM च्या उमेदवारांशी संपर्क केल्याचे अंदाज आहेत. यासंदर्भात बाबूलाल मरांडी आणि सुदेश महतो यांच्याशी पक्षाचा संपर्क झाल्याचे समजतेय.
आज तक वाहिनीच्या सूत्रांनुसार, झारखंड विधानसभा निवडणूक निकालाचा प्राथमिक कल हाती येताच जेवीएमचे बाबुलाल मरांडी धनवार मतदारसंघातून आघाडीवर असल्याचे समजत आहे.
मतमोजणीच्या पहिल्या फेरीत 81 पैकी 71 जागांचे प्राथमिक कल समोर आले आहेत. यामध्ये ४० हुन अधिक जागी महागठबंधन हे भाजपवर भारी पडत असल्याचे संकेत आहेत. असे झाल्यास भाजपच्या हातून आणखीन एक राज्य सटकण्याची चिन्हे आहेत.
झारखंड विधानसभा निवडणूकीचा (Jharkhand Vidhansabha Election Results) निकाल आज, 23 डिसेंबर रोजी लागणार असून सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यावेळी पोस्टल बॅलेट तर्फे नोंदवण्यात आलेल्या मतांची मोजणी पहिल्यांदा होणार असून त्यानंतर ईव्हीएम (EVM) द्वारे नोंदल्या गेलेल्या मतांची मोजणी होईल. झारखंड विधानसभेचे शेवटच्या टप्प्यातील मतदान संपताच माध्यमातर्फे एग्झिट पोल जाहीर करण्यात आला होता, यातील एबीपी न्यूज सी वोटर सर्वेमध्ये महागठबंधन सत्तेत बाजी मारण्याची शक्यता वर्तवली आहे. एबीपी न्यूज सी वोटर सर्वेनुसार महागटबंधनला 13-39 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर,भाजपला 28-36 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.
यंदा मुख्य निवडणूक आयोगाच्या तर्फे 30 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान पूर्ण 81 विधानसभा जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. यावेळी झारखंड मधील सद्य विरोधी पक्षांनी म्हणजेच काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) आणि राष्ट्रीय जनता दल यांनी निवडणूक पूर्व युती जाहीर केली होती, यानुसार, JMM तर्फे 43 जागांवर तर काँग्रेस (Congress) तर्फे 31 आणि आरजेडी (RJD) तर्फे 7 जागांवर उमेदवार उभे करण्यात आले होते.
दरम्यान, विधानसभा निवडणूक 2014 मध्ये भाजपला 37 तर आजसूला 5 जागा मिळाल्या होत्या. झारखंड विधानसभेत 41 हा बहुमताचा जादूई आकडा गाठण्यासाठी भाजपला आजसूची मदत घ्यावी लागली. दरम्यान, आपले बहुमत अधिक बळकट करण्यासाठी भाजपने पुढे झारखंड विकास मोर्चाच्या 6 आमदारांना आपल्या पक्षात सहभागी करुन सरुकार स्थापन केले होते.यंदा भाजप विरुद्ध महागठबंधन निवडणूक निकालात जनतेचा कौल कोणाच्या बाजूने लागणार हे पाहण्यासाठे लेटेस्टली मराठी वर पहा क्षणोखसणीचे लाईव्ह अपडेट्स..
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)