Jharkhand Shocker: रुग्णाचे गुप्तांग कापले, शस्त्रक्रियेदरम्यानची घटना, पोलिसांत गुन्हा नोंद

झारखंड (Jharkhand) राज्यातील डाल्टनगंज (Daltonganj ) येथून काहीशी धक्कादायक आणि तितकीच विचित्र घटना पुढे येत आहे. येथील एका रुग्णालयात डॉक्टरांनी रुग्णावर शस्त्रक्रिया करताना चक्क त्याचे गुप्तांगच (Private Parts) कापल्याची धक्कादायक घटना कथीतरित्या घडली आहे.

Jharkhand Shocker: रुग्णाचे गुप्तांग कापले, शस्त्रक्रियेदरम्यानची घटना, पोलिसांत गुन्हा नोंद
Surgery (Photo credit- IANS)

झारखंड (Jharkhand) राज्यातील डाल्टनगंज (Daltonganj ) येथून काहीशी धक्कादायक आणि तितकीच विचित्र घटना पुढे येत आहे. येथील एका रुग्णालयात डॉक्टरांनी रुग्णावर शस्त्रक्रिया करताना चक्क त्याचे गुप्तांगच (Private Parts) कापल्याची धक्कादायक घटना कथीतरित्या घडली आहे. रुग्णावर मुत्रालयाच्या समस्येवर उपचार घेण्यासाठी रुग्ण डॉक्टरकडे आला होता. दरम्यान, गुप्तांग कापल्याचे समजताच रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात घातलेला गोंधळ पाहून रुग्णालयातील कर्मचारी भेदरले आणि त्यांनी तेथून पळ काढला. त्यानतर नातेवाईकांनी त्यानंतर रुग्नाला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्राप्त माहिती अशी की, 50 वर्षीय रुग्णाला लघवीचा त्रास होत होता. त्याच्या त्रासावर उपचारासाठी त्याने खासगी हॉस्पिटल गाठले. खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला सांगितले की, लहान ऑपरेशन करावे लागेल. रुग्णाने होकार दिला आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टवर शस्त्रक्रिया करण्यात आली. (हेही वाचा, Attack Lesbian Couple: क्रूरतेचा कळस! 'लेस्बियन कपल'वर तरुणांचा हल्ला; केली मारहाण, प्रायव्हेट पार्टसमध्ये घुसवले गरम रॉड)

शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला जनरल वॉर्डात हलवण्यात आले. रात्री तो माणूस शौचालय वापरण्यासाठी उठला पण त्याला लघवी करण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे मोठ्या उत्सुकतेने त्याने वाकून पाहिले आणि तपासले तर त्याला धक्का बसला. त्याचे गुप्तांग गायब होते. घडला प्रकार रुग्णाने आपल्या कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. नातेवाईकांनी रुग्णालयातच गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

नातेवाईकांचा गोंधळ पागचा रूग्णालयातील कर्मचार्‍यांनी प्रथम त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र गोंधळ वाढल्यानंतर ते पळून गेले. रिपोर्ट्सनुसार, एका डॉक्टरने एका मीडिया आउटलेटला सांगितले की रुग्णाची खरंच सुंता शस्त्रक्रिया नावाची शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांनी त्याच्या गुप्तांगाचा काही भाग काढून टाकला. तथापि, त्याच्या प्रायव्हेट पार्टला सूज आल्याने रुग्ण घाबरला आणि त्याला असे वाटले की त्याचे गुप्तांग कापले गेले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Dec 27, 2022 02:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).